राशिवडे : भोगावतीचे नव नियुक्त संचालक, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर भोगावती वरील कजार्ची माहिती घेतली. प्रशासकीय अध्यक्ष संभाजीराव निकम यांनी भोगावतीवर मे २०१७ अखेर २४४ कोटी ६७ लाखाचे कर्ज असल्याची माहीती दिली. सत्तेवरुन पाय उतार झालेल्या राष्ट्रवादी, शेकाप व मीत्र पक्षांनी भोगावतीवरील कजार्ची श्वेतपत्रिका काढली नव्हती त्यामुळे कजार्बाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. कारखान्यावर नेमके कर्ज कीती याविषयी निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांनी तिन्ही पँनेलनी धुरळा उडवला होता. कारखाना अर्थिक अडचणीत असल्यामुळे मोठया विश्वासाने सभासदांनी निवडणुकीमध्ये पी.एन. पाटील यांच्यासह २१ जणांवर कारखाना अर्थिक अडचणीतुन बाहेर काढण्याची जबाबदारी दिली. या जानिवेतून पी.एन.पाटील यांनी भोगावतीवर कर्ज किती यांची माहीती प्रशासकीय अध्यक्ष निकम यांचेकडून घेतली. यामध्ये कारखान्यावर २४४ कोटी ६७ लाखाचे कर्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामधून कारखान्याकडे शिल्लक असणा?्या साखर व मोलँसिस विक्री अंदाजे किंमत १५९ कोटी ७७ लाख वजा करता ८४ कोटी ९० लाखाचे कर्ज आहे.यामध्ये मालतारण साखर कर्ज१३१ कोटी ७३ लाख,खेळते भांडवली कर्ज २२ कोटी ६६ लाख, पुर्व हंगामी कर्ज २ कोटी ८९ लाख, अबकारी कर्ज १२ कोटी ६१ लाख, सॉफ्टलोन १८ कोटी ६२ लाख, बँक आॅफ इंडीया तोडणी ओढणी कर्ज २२ कोटी ७३ लाख तर अपात्र कर्जमाफी राखीव रक्कम २ कोटी ६ लाख याचा समावेश आहे.तर तोडणी ओढणी बिले ४ कोटी, कामगार पगार नोव्हेबर २०१६ ते मार्च २०१७ देणे ८ कोटी ९२ लाख,ग्रँच्युटी १ कोटी ३२ लाख,सभासद साखर सवलत दर फरक १० कोटी ५४ लाख, बँक व्याज १ कोटी,मुदतबंद ठेवी २ कोटी ४२ लाख,व्यापारी देणी ४ कोटी, शासकीय देणी १ कोटी ३४ लाख, किरकोळ देणी पाच लाख याचा समावेश आहे. एकुण कर्ज २४४ कोटी ६७ लाखातुन कारखान्याकडे शिल्लक असणा?्या साखर व मोलँसिसची अंदाजे किंमत १५९ कोटी ७७ लाख वजा करता कारखान्यावर ८४ कोटी ९० लाखाचे कर्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे कर्ज मात्र शिल्लक साखर व मोलँसिस विक्री झाल्यावर शिल्लक राहणार आहे. बाजारपेठेतील साखर व मोलँसिसचा दर घसरला तर कजार्ची रक्कमही वाढण्याची शक्यता आहे.भोगावतीकडे चार लाख एक्कावन्न हजार नऊशे एकोनतीस साखर पोती शिल्लक आहेत, त्यांची अंदाजे किंमत १५८ कोटी १७ लाख इतकी होते तर १ कोटी ६० लाखाचे मोलँसिस शिल्लक आहे. या दोन्ही मालाची विक्री झाली तरच कर्ज ८४ कोटी ९० लाखावर येणार आहे. आजअखेर भोगावतीवर २४४ कोटी ६७ लाखाचे कर्ज आहे.
भोगावती वरील कर्जाची पी. एन. यांनी घेतली माहिती
By admin | Published: May 05, 2017 10:25 PM