शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

पंचगंगा पुुुनरुज्जीवनाचा ४८५ कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 1:43 AM

विश्वास पाटील । कोल्हापूर : करवीर, कागल, राधानगरी आणि हातकणंगले तालुक्यांतील ६४ गावांत सांडपाणी प्रक्रिया केंद्रे व नदीकाठी दोन ...

ठळक मुद्दे‘सामाजिक वनीकरण’चा पुढाकार : ६४ गावांत सांडपाणी प्रक्रिया केंद्रे नदीकाठी होणार बांबू लागवड

विश्वास पाटील ।कोल्हापूर : करवीर, कागल, राधानगरी आणि हातकणंगले तालुक्यांतील ६४ गावांत सांडपाणी प्रक्रिया केंद्रे व नदीकाठी दोन किलोमीटर अंतरात जमिनीची धूप थोपविण्यासाठी बांबू लागवडीचा कार्यक्रम सुचविणारा तब्बल ४८५ कोटी रुपयांचा पंचगंगा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आराखडा सामाजिक वनीकरण विभागाने तयार केला आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आतापर्यंत अनेक आराखडे झाले; त्यातील काहींची अंमलबजावणी सुरू आहे. तोपर्यंत हा नवीनच आराखडा तयार करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या बंगलोरच्या इन्स्टिट्यूट आॅफ वूड सायन्स अ‍ॅँड टेक्नॉलॉजी (आयडब्लूएसटी) या संस्थेने मूळ वनीकरण हस्तक्षेपातून कृष्णा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात कोल्हापूरसह सांगली, सातारा व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना कृष्णेच्या उपनद्या असलेल्या नद्यांच्या प्रदूषणासंदर्भात असे आराखडे तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पंचगंगा नदीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. चार जिल्ह्यांतून वनविभागाच्या क्षेत्रातील कामे व ती वगळून अन्य कामे असे स्वतंत्र आराखडे मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने मागविले आहेत. त्यांच्या कार्यालयाकडून हे सर्व आराखडे एकत्रित करून ते बंगलोरच्या संस्थेकडे पाठविले जाणार आहेत. सामाजिक वनीकरण विभागाने गुगल मॅपिंगच्या साहाय्याने जी गावे निश्चित केलेल्या अंतरामध्ये समाविष्ट होतात, त्या गावांमध्ये ही कामे सुचविण्यात आली आहेत. कागल तालुक्यातील वंदूर गावात सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुचविण्यात आले आहे. त्यासाठी ९१ लाख अपेक्षित खर्च धरण्यात आला आहे. वाळवे खुर्द ते सुळकूडपर्यंत नदीकाठी बांबू लागवडीसाठी ३२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

नदीकाठच्या गावांना सांडपाणी प्रक्रिया केंद्रे करणे शक्य होत नाही. केंद्र सरकारच्या निधीतून ती होत असतील तर व्हावीत, या हेतूने सरसकट अशी केंद्रे सुचविण्यात आली आहेत; परंतु ग्रामीण भागांत प्रक्रिया करण्याएवढे सांडपाणीच नदीत मिसळत नसल्याचे यापूर्वीच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

नेमके काय करणार?कृष्णा नदीच्या पात्रापासून पाच किलोमीटरच्या कक्षेत येणारी गावे व तिच्या उपनद्यांच्या पात्रापासून दोन कि.मी.च्या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारणे व नदीपासून दोन कि मीच्या अंतरात नदीकाठी व रस्त्याच्या कडेला बांबूच्या लागवडीचा कार्यक्रम हाती घेणे. सांडपाणी रोखल्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत आणि बांबंूमुळे नदी व जमिनीची धूप कमी होईल.

 

  • असा आहे आराखडा

तालुका काम रक्कमकरवीर २७ ३७२ कोटी ८८ लाखहातकणंगले १६ १६ कोटी २७ लाखराधानगरी १७ ६१ कोटी ४० लाखकागल २७ ३५ कोटी ५१ लाख

  • ८७ कामे ४८५ कोटी १८ लाख

 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कृष्णा नदीच्या प्रदूषण नियंत्रणाचा अभ्यास अहवाल तयार आहे. पंचगंगा प्रदूषणाबाबतही हायकोर्टच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत कामे सुरू आहेत. असे असताना प्रदूषणाची कोणतीच तांत्रिक माहिती अवगत नसलेला हा आराखडा करून मागितला जावा, हेच खरे आश्चर्य आहे.- उदय गायकवाड, प्रदूषण नियंत्रण समिती

टॅग्स :pollutionप्रदूषणkolhapurकोल्हापूरriverनदी