शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

पंचगंगा नदीच्या प्रदूषणप्रश्नी आराखडा केंद्राकडे पाठविणार

By admin | Published: October 02, 2015 1:08 AM

राज्य सरकार सकारात्मक : मुंबईत बैठक, निधीसाठी सूचना

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषण रोखण्याबद्दल कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी जिल्हा परिषदेने १०८ कोटींच्या तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण गुरुवारी मुंबई मंत्रालयातील पर्यावरण विभागातील बैठकीत झाले. पर्यावरण विभागाच्या अप्पर सचिव मालिनी शंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निधीसाठी केंद्राकडे आराखडा पाठविण्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांनी आराखड्यासंबंधी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, कोल्हापूर, इचलकरंजीसह ग्रामीण भागातील ३९ गावे पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असल्याचे समोर आले. उच्च न्यायालयातही यासंबंधी याचिका दाखल झाली आहे. कोल्हापूर व इचलकरंजीस प्रदूषण कायमस्वरूपी रोखण्यासाठी निधी मिळत आहे. ३९ गावांनाही निधीची गरज आहे. त्यामुळे १०८ कोटींचा आराखडा तयार केला आहे. ३९ गावांतील लोकसंख्या सुमारे नऊ लाख आहे. प्रदूषण रोखण्यासाठी तात्परत्या उपाययोजना लोकसहभागातून प्रभावीपणे राबविल्या आहेत. गणेशोत्सवात मूर्ती आणि निर्माल्य दानला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एक लाखांवर मूर्ती भक्तांनी स्वत:हून दान केल्या आहेत. या गावांत प्रदूषणाबद्दलच्या कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून निधी मिळावा. तसेच केंद्राकडून निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवावेत.सचिव शंकर म्हणाल्या, निधीसाठी पाणीपुरवठा विभाग व ‘नाबार्ड’कडे प्रस्ताव पाठवावेत. पाणीपुरवठा विभागाला निधी देणे शक्य नसल्यास कारणे द्यावीत. राज्य शासनाचा २० टक्के निधीचा वाटा मिळविण्यासाठी प्रदूषण विषयाशी संबंधित सर्वच विभागांकडे प्रस्ताव देऊन पाठपुरावा करावा. निधी मिळण्यासाठी पर्यावरण विभाग सकारात्मक आहे. केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. यावेळी प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली. प्रदूषण, पाणीपुरवठा या विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी विविध सूचना दिल्या.विशेष कौतुकरक्षाविसर्जनामुळे जलप्रदूषण होते, यासंबंधी जिल्हा परिषदेने व्यापक जागृती केली. यामुळे रक्षाविसर्जन करण्याचे ग्रामस्थांनी स्वत:हून बंद केले आहे, असे सीईओ सुभेदार यांनी बैठकीत सांगितले. या यशस्वी उपक्रमाचे सचिव शंकर यांनी विशेष कौतुक केले.