शहरं
Join us  
Trending Stories
1
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास विक्रमाला घातली गवसणी
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
5
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
6
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
7
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
8
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
9
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
10
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
11
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
12
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
13
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
14
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
16
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
17
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
18
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
19
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
20
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले

पंचायत राज’कडून कोल्हापूर अधिकाऱ्यांची झाडाझडती वडणगे पाणी योजनेवरून फैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 12:57 AM

जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायत राज समितीने पहिल्याच दिवशी अधिकाºयांची झाडाझडती घेतली. ग्रामविकास आणि शिक्षण विभागाच्या सचिवांना साक्षीसाठीही बोलावण्याचे आदेश समितीने दिले असून वडणगे पाणी योजनेवरून जोरदार फैरी

ठळक मुद्दे‘ ग्रामविकास, शिक्षण विभागाच्या सचिवांना साक्षी देण्याचे आदेशवडणगे पाणी योजनेवरून जोरदार फैरी झडल्याचे समजते

कोल्हापूर : जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायत राज समितीने पहिल्याच दिवशी अधिकाºयांची झाडाझडती घेतली. ग्रामविकास आणि शिक्षण विभागाच्या सचिवांना साक्षीसाठीही बोलावण्याचे आदेश समितीने दिले असून वडणगे पाणी योजनेवरून जोरदार फैरी झडल्याचे समजते.

सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती तीन दिवसांच्या दौºयावर आली आहे. सकाळी शासकीय विश्रामगृहावर पदाधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर समिती जिल्हा परिषदेमध्ये आली. वसंतराव नाईक समिती सभागृहामध्ये अधिकाºयांच्या बैठकीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच आमदारांनी आक्रमक भूमिका घेऊन २0१३/१४ च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदासंदर्भात अधिकाºयांच्या साक्षी घेतल्या.

शिक्षण, ग्रामपंचायत, बांधकाम, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा विभागांच्या परिच्छेदावर यावेळी जोरदार आक्षेप घेण्यात आले. त्या-त्या वेळी या विभागांचे काम पाहणारे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. शिक्षण आणि ग्रामपंचायत विभागाच्या प्रश्नांबाबत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अखेर या विभागाच्या सचिवांना साक्षीला बोलावण्याचे आदेश समितीने दिले.

या दरम्यान वडणगे पाणी योजनेच्या मुद्द्यावर समितीने कारभाराचा पंचनामाच केला. कंत्राटदारावर कारवाई केली की नाही, ती लवकर का केली नाही, किती वेळा निवेदने द्यावी लागली, अशी प्रश्नांची सरबत्तीच यावेळी करण्यात आली. अखेर याबाबतची कागदपत्रे मागवून संबंधित कंत्राटदाराकडून आवश्यक ती रक्कम वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. काही प्रकरणांमध्ये एक महिन्यात अहवाल देण्याचे आदेश समितीने दिल्याचे समजते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि काही विभागांचे बदलून गेलेले अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

समितीच्या एकूण २८ आमदारांपैकी १२ जण आले असून, आणखी दोन आमदार आज, गुरुवारी कामकाजात सहभागी होणार आहेत. गुरुवारी जिल्हाभर दौरा करण्यासाठी चार उपसमित्या करण्यात आल्या आहेत. गगनबावडा, राधानगरी, भुदरगडसाठी एक; शाहूवाडी, पन्हाळा, करवीरसाठी दुसरी; हातकणंगले, शिरोळ, कागलसाठी तिसरी; तर आजरा, गडहिंग्लज, चंदगडसाठी चौथी अशा समित्या तयार करण्यात आल्या असून त्यांच्यासमवेत अधिकारीही देण्यात आले आहेत.कोल्हापूरच्या दौºयावर आलेल्या पंचायती राज समितीने बुधवारी दिवसभर जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहात विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.रांगोळींची सजावट, पण वातावरणात तणावसमितीच्या स्वागतासाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारापासून बैठकीच्या सभागृहापर्यंत रांगोळी काढण्यात आली होती. लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर समिती सभागृहात जाण्यासाठी पायघड्याही घालण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. सर्व सदस्यांचे शाल, श्रीफळ आणि चाफ्याचे झाड देऊन स्वागत करण्यात आले. सभागृहातही फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. असे असले तरी दिवसभर जिल्हा परिषदेमध्ये तणावाचेच वातावरण होते. सर्व अधिकारी आणि वरिष्ठ कर्मचारी दिवसभर तिसºया मजल्यावर धावपळीत होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार