कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेने पंचगंगा नदी घाटावर गणेशमूर्ती विसर्जनावर बंदी आणली. त्यामुळे मंगळवारी घाट परिसराला बॅरिकेडिंग करून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. (छाया : नसीर अत्तार)
---
०२
कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या न्यू पॅलेसमधील मानाच्या गणपतीचे विसर्जनस्थळी पालखीतून आगमन झाले. (छाया : नसीर अत्तार)
--
०३
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा गजर करीत भाविक गणेशमूर्ती विसर्जनासाठी कोल्हापूरच्या पंचगंगा घाट परिसरात येत होते. (छाया : नसीर अत्तार)
---
०४
भाविकांनी दान केेलेले निर्माल्य एकटी संस्थेच्या खतनिर्मिती प्रकल्पाकडे नेण्यात येत होते. (छाया : नसीर अत्तार)
--
०५
गौरी-गणपतीला निरोप देताना महिलांनी पंचगंगा घाट परिसरातच फेर धरला. (छाया : नसीर अत्तार)
--
०६,०७
गणपती बाप्पांची अखेरची आरती करताना भाविक. (छाया : नसीर अत्तार)
--
०८
महापालिकेच्या वतीने ठेवण्यात आलेल्या काहिलीत गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या. (छाया : नसीर अत्तार)
--
०९
गणपती बाप्पांना वंदन करून निरोप देताना बालक. (छाया : नसीर अत्तार)
--
१०
विसर्जनासाठी आलेल्या भाविकांनी घाट परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते.(छाया : नसीर अत्तार)
--
११,१२
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना भाविक. (छाया : नसीर अत्तार)
---
१३
काहिलीत विसर्जित झालेल्या गणेशमूर्ती संजयसिंह गायकवाड यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित ठेवण्यात आल्या होत्या. (छाया : नसीर अत्तार)
--
१४
महिलांनाही गणेशमूर्तींचे विसर्जन केले. (छाया : नसीर अत्तार)
--
१५
गणपती बाप्पांना निरोप देण्याआधी अखेरचे छायाचित्र घेताना मुलगी. (छाया : नसीर अत्तार)
--