शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
“महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
3
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
4
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
5
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
6
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
7
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
8
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
9
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
10
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
11
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
12
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
13
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
14
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
15
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
16
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
17
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
18
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
19
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
20
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे पंचगंगा पात्राबाहेर; ५८ बंधारे पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 1:44 PM

दिवसभरात तब्बल ५ फुटाने पातळी वाढली 

कोल्हापूर : जिल्ह्यात आज पावसाचा जोर कमी होता. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती तर काही वेळ उघडीपही दिली. मात्र धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढच होत होती. आज, तब्बल ५८ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीतच राहिली. 

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जाेर वाढला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, चंदगड तालुक्यांत धुवांधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रात तर तुफान पाऊस कोसळत असल्याने पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.

राधानगरी धरण ६० टक्के भरले

राधानगरी धरण ६० टक्के भरल्याने बुधवारी दिवसभरात वीज निर्मितीसाठी सोडण्यात येणारा विसर्ग वाढविला आहे. त्यामुळे ‘भोगावती’, ‘कुंभी’, ‘कासारी’सह जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी सकाळी पात्राबाहेर आले. पंचगंगेची पातळी सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत तब्बल ५ फुटाने वाढली. रात्री उशिरा पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले.धरण क्षेत्रात सरासरी १३५ मिलिमीटर पाऊसधरण क्षेत्रात एकसारखा मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात सरासरी १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाटगाव धरण क्षेत्रात २९५, घटप्रभा धरण क्षेत्रात २५२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.दोन दिवस ऑरेंज अलर्टजिल्ह्यात आगामी दोन दिवस ऑरेंज अलर्ट असून, पावसाचा जोर कायम राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

शेतकरी सुखावला...खरीप पिकांसह भाताच्या रोप लागणीसाठी जोरदार पावसाची गरज होती. गेले दोन दिवस सुरू असलेल्या धुवाॅंधार पावसाने शेतीकामांना वेग आल्याने शेतकरी सुखावल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

अलमट्टीमध्ये २१ हजार घनफूट पाण्याची आवककोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने सगळ्यांच्या नजरा अलमट्टी धरणाकडे लागल्या आहेत. बुधवारी अलमट्टी धरणात प्रति सेकंद २१ हजार ६७२ घनफूट पाण्याची आवक होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीDamधरणFarmerशेतकरी