पंचगंगा नदी उद्योगामधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषित आहे. इचलकरंजी, हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील अनेक गावांत प्रदूषणाचा प्रादूर्भाव होत असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देत स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करत प्रदूषण नियंत्रणासाठी निधीची मागणी केली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, उल्हास पाटील, सत्यजित पाटील, डाॅ. सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र प्राधीकरण स्थापन करा, या मागणीचे निवेदन जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. यावेळी संजय मंडलिक, अरुण दुधवडकर, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, धैर्यशील माने आदी उपस्थित होते. (फोटो-०३०१२०२१-कोल-पंचगंगा)