शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

पंचगंगा नदी इशारा पातळीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली; २८ मार्गावरील वाहतूक बंद

By राजाराम लोंढे | Published: July 20, 2024 3:56 PM

अनेक मार्गावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत, नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आज, शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे, त्यात धरणातून विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पुराचे पाणी हळूहळू नदीकाठच्या गावात घुसू लागल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील ७९ बंधारे व अनेक मार्ग पुराच्या पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे. पंचगंगा ३६ फुटाच्या वरुन वाहत असून इशारा पातळीकडे आगेकुच सुरु ठेवली आहे.शुक्रवारी दिवसभर एक सारखा पाऊस कोसळत राहिला. रात्रभर पाऊस एक सारखा सुरु होता, शनिवारी दिवसभरही रिपरिप कायम राहिली. धरणक्षेत्रातही धुवांधार पाऊस कोसळत असल्याने विसर्गही वाढला आहे. राधानगरीतून प्रतिसेंकद १४५०, घटप्रभा मधून ८४३४, वारणा धरणातून १३९६ तर कोदे मधून ८१८ घनफुट पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीची पातळी ३६ फुटाच्या वर गेली असून इशारा पातळीकडे वाटचाल सुरु केल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.वारे आणि पावसाने अंगात हुडहुडीशुक्रवारी रात्री नऊ पासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत होता. वारा आणि पावसामुळे अंगात हुडहुडी भरली होती.पुराच्या पाण्याने २८ मार्ग बंदजिल्ह्यात सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने वाहतूकीचे मार्ग बंद झाले आहेत. राज्य मार्ग ५, प्रमुख जिल्हा मार्ग ११ तर ग्रामीण मार्ग १२ असे २८ मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. त्याचबरोबर गडहिंग्लज, गारगोटी व चंदगड तालुक्यातील एस. टी. चे तीन मार्ग बंद राहिले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीfloodपूरTrafficवाहतूक कोंडी