कोल्हापूर : जिल्ह्यात गेली तीन-चार दिवस धुवांदार पाऊस सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. सोमवारी सायंकाळी पंचगंगेने इशारा (३९ फुट) पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी येथील नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. तेरा नद्यांवरील ९५ बंधारे पाण्याखाली गेले असून ८ राज्य व २५ प्रमुख जिल्हा मार्गावर बंद झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
गेली चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. रविवारी रात्रभर पावसाचा जोर राहिला, सोमवारी सकाळपासून तर त्यात वाढ होत गेल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ७७.७५ मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात १३०.८३ तर गगनबावडा तालुक्यात १२४.५० मिलीमीटर झाला. पंचगंगेची पातळी दिवसभरात तीन फुटांने वाढली, सायंकाळी पातळी ३९ फुटाच्या पुढे गेल्याने महापूराचे संकट अधिक गडद झाले आहे.
गेली चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. रविवारी रात्रभर पावसाचा जोर राहिला, सोमवारी सकाळपासून तर त्यात वाढ होत गेल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ७७.७५ मिलीमीटर पाऊस झाला.
सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात १३०.८३ तर गगनबावडा तालुक्यात १२४.५० मिलीमीटर झाला. पंचगंगेची पातळी चार तासांत फुटांने वाढली, त्यात पावसाचा जोर असाच कायम राहिला तर महापुराचे संकट येणार हे निश्चित आहे.पाटगावसह आठ धरणे भरलीभुदरगड तालुक्यातील पाटगाव धरण सोमवारी सकाळी आठ वाजता पूर्ण क्षमतेने (३.७२ टीएमसी) भरले. त्यातून प्रतिसेकंद १०७२ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ धरणे भरली असून सहा अद्याप बाकी आहेत.
चिखली गावातील आतापर्यंत २५ टक्के लोकांनी स्थलांतर केले आहे. उर्वरीत लोक स्थलांतर करत आहेत. पी. ए. सिस्टमवर अनाऊंस्मेंट सुरु आहे.धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये असा -राधानगरी (८.३६), तुळशी (३.२८), वारणा (३१.५०), दूधगंगा (२३.६३), कासारी (२.३६), कडवी (२.५२), कुंभी (२.४१), पाटगाव ( ३.७०).