अधिक माहितीनुसार मुख्य रस्त्याचे काम संपण्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी जाणार असून, जवळच असणारे साधोबा तळ्याचा पाणी जाण्याचा मार्ग या पडलेल्या रस्त्यातून जात आहे. यासाठी मोठा पाणी मार्ग ठेवून रस्त्यात दगड भुकटी टाकून रोज अर्धा मीटर पद्धतीने काम होईल. यावेळी मंगळवार पेठेतून येणारा पायी मार्ग आहे. तसाच ठेवून हे काम होणार आहे. रस्त्यासाठी सहा टप्पे धरण भिंती प्रमाणे होणार आहेत. रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने होईल. दरम्यान अजूनही पावसामुळे पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. तरीसुद्धा पर्यटकांनी पडलेल्या रस्त्याच्या कडेने चालत येण्यासाठीच वापर करावा व आणलेल्या चारचाकी गाड्या बुधवारपेठ येथे थांबवाव्या जेणेकरून रस्त्याचे काम करणाऱ्या गाड्यांना अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अभियंता ऐरेकर यांनी केले
पन्हाळ्याच्या रस्त्याचे काम मंगळवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:29 AM