पन्हाळा : पन्हाळा तालुक्यात सध्या पडत असलेले कडक ऊन, तर मध्येच ढगाळ वातावरण अशा वातावरणातील बदलामुळे परिसरात व्हायरल फ्लूने डोके वर काढले आहे. यामुळे तालुक्यात रुग्णांंच्या सख्येत वाढ झाली आहे. थंडी, ताप, खोकला, थकव्याने रुग्ण बेजार झाले असल्याने आरोग्य केंद्र, खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पन्हाळा तालुक्याचे आरोग्य बिघडले आहे.
तालुक्यात दिवसभर कडक ऊन, ढगाळ वातावरण, अचानकपडणारा पाऊस, तर कधी उष्णता, तर कधी गारवा असे वातावरण निर्माण होत आहे. परिणामी थंडी, ताप, खोकला, आदी आजार वाढू लागले आहेत. काही रुग्ण डॉक्टरांकडे जाण्याऐवजी ते आजार अंगावरकाढत असल्यामुळे तसेच योग्य ती काळजी न घेणे, पोषक आहारनसणे, अशा प्रसंगी योग्य तीदक्षता न घेतल्याने आजाराचेप्रमाण गंभीर होत आहे. परिणामी, टायफॉईड, स्वाईन फ्लू, डेंग्यू, कावीळ यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
पन्हाळा तालुक्यातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. मच्छरांमुळे डेंग्यूची लागणही अनेक ठिकाणी झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जोरदार पाऊस पडून गेल्याने नदी, विहिरीचे पाणी गढूळ झाले आहे. त्यातच जलस्रोतांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याने ठिकठिकाणी दूषित पाणी झाले आहे.या दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी, अतिसार, हगवण, कावीळ व हिवतापाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे चित्र रुग्णालयांमध्ये पाहायला मिळत आहे.
अंगदुखी बरोबरच सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयांमध्ये गर्दी करू लागले आहेत. ताप, सर्दी, खोकला, अंग मोडून पडणे, अनुत्साही वाटणे, डोके दुखणे, अशा तक्रारी घेऊन रुग्ण रुग्णालयात येत आहेत.पावसाळा सुरू झाल्यापासुन व्हायरल फ्लूच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. विषाणू आणि कीटक यांच्यावाढीस पोषक वातावरण तयार झाल्याने आरोग्य धोक्यात आले असल्याचे आरोग्यतज्ज्ञाचे म्हणणे आहे.शासकीय रुग्णालयात मोफत उपचारसदर परिस्थिमध्ये फ्लू सदृश्य आजाराच्या रुग्णांनी घरगुती उपचारावर अवलंबून न राहता वैद्यकीय अधिकाºयाकडून तपासणी करून औषधोपचार घ्यावेत.स्वाईन फ्लू, डेंग्यू, आदी आजारांच्या तपासणीसाठी तालुक्यातील प्रत्येक प्रा. आ. केंद्र ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी मोफत सुविधा उपलब्ध असून, सदर आजारांसाठीच्या उपचारासाठी आवश्यक औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आला आहे.आरोग्य कमर्चाºयांमार्र्फा गृहभेटीद्वारे संबंधित रुग्ण शोधून वैद्यकीय अधिकाºयांमार्फत तपासणी व आवश्यक उपचार केले जात असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल कवठेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.नागरिकांनी घाबरून न जाता वेळेत तपासणी व उपचार करून सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. कवठेकर यांनी केले आहे.