कोल्हापूर : घरादाराला उजळवणारी दिवाळी सर्वत्र साजरी होत आहे; पण ज्यांनी स्वराज्य स्थापन करून रयतेचे आयुष्य उजळविले त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले अंधारात राहू नयेत म्हणून कोल्हापूरच्या हायकर्स ग्रुपच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या आदल्या दिवशी पन्हाळगडावर पाच हजार दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जातो.
या दीपोत्सवामुळे सोमवारी पहाटे पन्हाळगड उजळून निघाला होता. तीन दरवाजा परिसर, बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा, शिवाजी महाराजांचे मंदिर पसिराचे सौंदर्य मिणमिणत्या पणत्यांच्या प्रकाशात अधिकच खुलून आले.