कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी येत्या १५ दिवसांत शासनाने खऱ्या आरोपींचा शोध न घेतल्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानास घेराव घालून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा, समता संघर्ष समितीच्यावतीने बुधवारी देण्यात आला. या समितीच्यावतीने दिवसभर बिंदू चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी ‘गोविंद पानसरे अमर रहे, ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. पानसरे यांच्या हत्या प्रकरणाला बुधवारी चार वर्षे पूर्ण झाली असतानाही तपास यंत्रणेला मारेकºयांनी वापरलेले पिस्तूल, गाड्या, फरार आरोपींचा शोध घेता आला नसल्याने या जनताविरोधी सरकारला आगामी निवडणुकीत घरचा रस्ता दाखवा, असा इशारा नामदेवराव गावडे दिला. मुक्ता दाभोलकर यांनीही जनतेने धर्मनिरपेक्षता आणि विवेकी विचारसरणीच्या पाठीशी राहावे, असे आवाहन केले.
विवेकी विचारांच्या खुनांचा तपास करण्याची सत्ताधाºयांची मानसिकता नसल्याने त्यांना मुळासकट उपटून टाका, असे आवाहन त्यांनी केले. पानसरे स्मारकासाठी निधी देण्याची घोषणा आमदार सतेज पाटील यांनी केली.पानसरे निवासस्थानापासून ‘मॉर्निंग वॉक’ पानसरे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे निवासस्थान ते बिंदू चौक असा ‘मॉर्निंग वॉक’काढण्यात आला. त्याची सुरुवात ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, उमा पानसरे आणि मुक्ता दाभोलकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार करुन झाली.
विवेकाचा आवाज बुलंद करण्याची शपथ कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी सकाळी ‘विवेकाचा आवाज बुलंद’ करण्याची शपथ पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी ‘शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या विचारवंतांचे वारसदार म्हणून त्यांचे कार्य आम्ही पुढे नेऊ, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे निवासस्थान ते बिंदू चौक असा ‘मॉर्निंग वॉक’काढण्यात आला. त्याची सुरुवात ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, उमा पानसरे आणि मुक्ता दाभोलकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार करुन झाली. प्रा. पाटील म्हणाले,‘या देशात धर्मांध शक्तींंनी आपले डोके वर काढले आहे. ज्यांना गजाआड घालण्याची आवश्यकता आहे. त्याविरोधात आवाज उठवतात त्यांची अभिव्यक्ती ठेचून काढण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. अशा शक्तींच्या विरोधात आपण उभे राहिले पाहिजे.’
मुक्ता दाभोलकर म्हणाल्या,‘ कर्नाटक पोलिस गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यापर्यंत पोहचले. परंतू महाराष्ट्र सरकारला मात्र अजूनही दाभोलकर, पानसरे यांच्या खून्यांना बेड्या ठोकता आलेल्या नाहीत. हा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला आहे. भारतातील चार विवेकवाद्यांची हत्या झाली, त्यांच्या मास्टरमाइंडपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.