शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

पानसरे हत्येमध्ये कोल्हापूरातील दोघांचा सहभाग, लवकरचं अटक : एसआयटीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 2:15 PM

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापुरातील स्थानिक दोघांचा सहभाग असलेची कबुली नववा संशयित आरोपी शरद भाऊसाहेब कळसकर (वय २५, रा. केसापुरी, औरंगाबाद) याने पोलीस कोठडीमध्ये दिली आहे. त्या दोघांना लवकरच अटक केली जाईल, असे संकेत एसआयटीने दिले आहेत.

ठळक मुद्देपानसरे हत्या प्रकरणी शरद कळसकरला ८ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडीकळसरकरची मुंबईच्या अर्थवरोड कारागृहात रवानगी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापुरातील स्थानिक दोघांचा सहभाग असलेची कबुली नववा संशयित आरोपी शरद भाऊसाहेब कळसकर (वय २५, रा. केसापुरी, औरंगाबाद) याने पोलीस कोठडीमध्ये दिली आहे. त्या दोघांना लवकरच अटक केली जाईल, असे संकेत एसआयटीने दिले आहेत.

कळसकरच्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्यासमोर हजर केले असता ८ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्याची रात्री उशीरा मुंबईच्या अर्थवरोड कारागृहात रवानगी केली.मुंबईतील नालासोपारा परिसरातील एका घरातून पोलिसांनी गावठी बॉम्ब, डिटोनेटर, आठ पिस्तुले, आदी हत्यारे जप्त केली होती. या प्रकरणी मुंबईच्या दहशतवादी विरोधी पथकाने शरद कळसकरला अटक केली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या संशयावरून कळसरकरला अटक केली. त्यानंतर कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश हत्येमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने बंगलोर एसआयटीने अटक केली. त्यानंतर पानसरे हत्या प्रकरणी त्याला दि. १० जून रोजी अटक केली.

पहिल्यांदा सात दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये बेळगावमध्ये झालेल्या बैठकींची ठिकाणे व काही साक्षीदारांची रुजवात त्याने घालून दिली. त्यानंतर पानसरे हत्येमध्ये कोल्हापुरातील स्थानिक आणखी दोघांचा समावेश असून त्यांचे वर्णन सांगितले. त्यामुळे एसआयटीने दूसऱ्यांदा न्यायालयात हजर करुन आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी मागवून घेतली.

चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये कळसरकरच्या गावी केसापुरी, औरंगाबाद येथे घरी व शेतामध्ये छापा टाकून डायरी व मोबाईल त्याने लपविला होता. त्याचा शोध घेतला. कळकसर हा कोल्हापूरात उद्यमनगर परिसरात वास्तव्यास होता. तेथील काही लोकांकडे पथकाने चौकशी केली.

स्थानिक दोघांचा समावेश असणाऱ्यांची माहिती उपलब्ध केली आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती एसआयटीने न्यायालयास केस डायरीमधून गोपनियरित्या दिल्याचे समजते. त्या दोघे सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असल्याचेही बोलले जाते. एसआयटीने याबाबत गोपनियता ठेवली असून त्यांना अटक केलेनंतर नाव निष्पन्न होणार आहेत. सुनावणीला तपास अधिकारी अमृत देशमुख यांचेसह टिम उपस्थित होती.दोन मिनिटात सुनावणीचौदा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सोमवारी कळसकरला एसआयटीच्या पथकाने न्यायालयात हजर केले. न्यायाधिशांना न्यायालयीन कोठडी देण्यासंबधीचे विनंती पत्र दिले. त्यांनी लगेचच न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर कळसकरला पथक बाहेर घेवून गेले. अवघ्या दोन मिनिटामध्येच ही सुनावणी झाली.

संशयित आरोपीचे वकील समीर पटवर्धन न्यायालयात हजर होते. कळकरला आॅनलॉक प्रोव्हेजन अ‍ॅक्ट (युएपीए) नुकसार डॉ. दाभोलकर गुन्ह्यामध्ये ‘मोक्का’ लावला आहे. पानसरे हत्येमध्येही ‘मोक्का’ लावतात काय? अशी शंका अ‍ॅड. पटवर्धन यांना होती. ते तयारीनुसार आले होते. परंतु एसआयटीने या कलमाची मागणीच केली नाही. हे कलम लावले असते तर ३० दिवसांची पोलीस कोठडी कळकसरला मिळाली असती. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर