कागल : येथील राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत गडहिंग्लजच्या परशुराम भोई याने मुलांच्या, तर निपाणीच्या वैष्णवी रावण हिने मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन समरजित घाटगे व आर्यवीर घाटगे यांच्या हस्ते झाले.
मॅरेथॉन स्पर्धेत मुलींच्या गटात १००, तर मुलांच्या गटात सव्वाशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. बाळासाहेब जाधव व अश्विनीकुमार नाईक यांनी स्पर्धेचे आयोजन व नियोजन केले होते. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेतील अन्य विजेत्यांची नावे अशी : मुलींचा गट- सिद्धी रवंदे (कोल्हापूर), निकिता बोंगार्डे (इचलकरंजी), ऋतुजा तळेकर (केनवडे), प्रमिला पवार (पाडळी), चैत्राली पाटील (केनवडे, साक्षी पाटील (केनवडे).
मुले गट-धनाजी कौलवकर (कोरोची), शहाजी करूळकर (कोल्हापूर), भाऊ केरूळकर (कोरोची), बाबासाहेब देवकाते (मिरज), अभिषेक देवकाते (कोल्हापूर), तुकाराम मोरे (कोल्हापूर). स्पर्धा संपताच विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. पंच म्हणून के. बी. चोगुले आणूर यांनी काम पाहिले. यावेळी राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी. पाटील, उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, बॉबी माने, युवराज पसारे, प्रवीण गुरव, रमेश सनगर, पप्पू कुंभार, प्रमोद कदम, अजितसिंह घाटगे आदींची उपस्थिती होती.
२४ कागल मॅरेथॉन
छायाचित्र- कागल येथे राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करताना समरजित घाटगे व आर्यवीर घाटगे.