कागल हेडींग अपूर्ण आहे, कृपया पाहावे......
कागल : कागल तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या जागांसाठी निवडणूक होत असून १९५ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. गुरुवारी प्रत्येक मतदान केंद्रावर पाच जण या पद्धतीने दुपारी दोन वाजता सर्व कर्मचारी, अधिकारी ज्या त्या गावात पोहोचले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका कागल तालुक्यात होत आहेत. येथील तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या गोदामाबाहेर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सकाळी सात वाजता सर्वांना बोलाविण्यात आले होते. निवडणूक निरीक्षक तथा उपजिल्हाधिकारी अश्विनी जिरगे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार शिवाजीराव गवळी यांनी सर्वांना सूचना केल्या. एकूण तीस एसटी बसेसमधून हे निवडणूक साहित्य ४८ गावात पाठविण्यात आले.
या निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या सोयीनुसार नेत्यांच्या आदेशांना डावलून आघाड्या केल्या आहेत. तसेच प्रमुख गटात फूटही पडली आहे. प्रचाराच्या जाहिरातीवर सर्वच नेत्यांचे फोटो छापले गेल्याचे प्रकार झाले आहेत.
चौकट. :
संवेदनशील गावात जादा बंदोबस्त....
बाणगे, म्हाकवे, बेलवळे खुर्द, बेलवळे बुद्रुक, सिद्धनेर्ली, साके ही कागल पोलीस ठाण्याअंतर्गत येणारी गावे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. जादा पोलीस तुकड्या मागविण्यात आल्या आहेत. जलद कृती दलाचीही एक तुकडी फिरत राहणार आहे. प्रत्येक मतदान केद्रात एक पोलीस असेल.
निवडणूक लागलेल्या एकूण ग्रामपंचायती...
53 बिनविरोध झाल्या. 05 आज मतदान 48 गावात. ○ एकूण जागा 448 ○ उमेदवार 1049 ○ मतदान केंद्रे 195 ○ एकूण निवडणूक कर्मचारी- 975
फोटो कॅप्शन
कागल तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी गुरुवारी येथील गोदामाजवळ निवडणूक कर्मचारी एकत्र जमले होते.