कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापाºयांचे आयकर भरण्याचे प्रमाण चांगले आहे. देशाच्या विकासाच्यादृष्टीने या भागाला विशेष महत्त्व आहे. नोटाबंदीच्या कालावधीत अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यात भरणाºयांबाबतची माहिती एकत्रित झाली आहे. त्यातील एक कोटीहून अधिक रक्कम भरणाºयांना ‘आयकर’कडून नोटीस गेली आहे. त्यास उत्तर न देणाºयांना दुसरी नोटीस पाठविली आहे. अतिरिक्त रकमेचे विवरण न देणाºयांवर कारवाई केली जाईल, असे पुणे येथील प्रधान मुख्य आयकर आयुक्त आशू जैन यांनी सोमवारी येथे सांगितले.
येथील आयकर विभागातर्फे आयोजित व्यापारी, उद्योजक संघटनांना आयकर विषयक मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. न्यू शाहूपुरी येथील वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल आॅफ द इन्स्टिट्यूट चार्टर्ड अकौंटंट आॅफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी जैन म्हणाले, सध्या आयकरदात्यांची संख्या तीन कोटींवरून सहा कोटींवर पोहोचली आहे. नागरिकांनी योग्य कर भरल्यास ती दहा कोटींपर्यंत जाईल. गेल्या आर्थिक वर्षात देशात १० लाख कोटी रु.चा कर जमा झाला. यावर्षी ११ लाख ५० हजार कोटी रु.पर्यंत कर जमा करण्याचे उद्दिष्ट आहे.
‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे, माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, इंजिनिअरिंग असो.चे अध्यक्ष नितीन वाडीकर, ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष महेश यादव, द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट आॅफ इंडियाचे कोल्हापूर अध्यक्ष नवीन महाजन, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, ‘मॅक’चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, ‘गोशिमा’चे लक्ष्मीदास पटेल, भरत ओसवाल, आदींसह चार्टर्ड अकौंटंट, करसल्लागार, उपस्थित होते. कोल्हापूरचे मुख्य आयकर आयुक्त एम. एल. कर्मकार यांनी प्रास्ताविक, संयुक्त आयकर आयुक्त शिवानंद कलाकेरी यांनी सूत्रसंचालन केले. आयकर आयुक्त (अपील) शिवराज मोरे यांनी आभार मानले.एका ‘क्लिक’वर माहितीआयकर विभागाच्या कामकाजामध्ये संगणकीकरणाचा वापर वाढत आहे. त्यामुळे एकीकडे विवरणपत्र भरणे, रिफंड मिळविणे करदात्यांसाठी सोपे झाले आहे. दुसरीकडे प्रत्येक करदात्याची संपूर्ण माहिती, त्यांचा उद्योग, व्यवसायाचे स्वरूप, त्यांची गुंतवणूक, बँकेतील व्यवहार, आदी स्वरूपातील सर्व माहिती एका क्लिकवर आयकर विभागाकडे उपलब्ध आहे.या माहितीचे विश्लेषण करणारी यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यातून वेळेवर कर भरणारे आणि कर भरत नसलेल्यांची यादी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे करदात्यांनी प्रामाणिकपणे आणि वेळेत कर भरून कारवाई टाळावी, असे आवाहन प्रधान मुख्य आयकर आयुक्त जैन यांनी केले.जैन म्हणालेकर हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.नागरिकांनी जास्तीत जास्त कर भरावा, यासाठी शासनाने विविध योजना बनविल्या आहेत.कररूपी महसुलातून आरोग्य, संरक्षण, शिक्षण, रोजगार, विज्ञान-तंत्रज्ञान, दळणवळण, आदी क्षेत्रांचा विकास केला जातो.नागरिकांनी योग्य आयकर भरून देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे.देशात २२ आयकर सेवा केंद्रे कार्यान्वित
कोल्हापुरात सोमवारी पुणे येथील प्रधान मुख्य आयकर आयुक्त आशू जैन यांनी व्यापारी, उद्योजकांना आयकर विषयक मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून नवीन महाजन, एम. एल. कर्मकर, शिवराज मोरे उपस्थित होते. दुसऱ्या छायाचित्रात व्यापारी, उद्योजकांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, आदी उपस्थित होते.