शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जोतिबा यात्रेकरुंसाठी पार्किंगची व्यवस्था

By admin | Published: April 04, 2017 5:35 PM

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे पोलीस अधीक्षक एम. बी. तांबडे यांचे आवाहन

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : जोतिबा चैत्र यात्रा दि. ८ ते १० एप्रिल या कालावधीमध्ये साजरी होत आहे. यात्राकाळात राज्यातून व परराज्यांतून लाखो भाविक खासगी व सार्वजनिक वाहनांनी डोंगरावर येत असतात. येथील भौगोलिक परिस्थिती पाहता रहदारीच्या प्रमुख मार्गांवर वाहनांचे पार्किंग होऊन वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यात्रेच्या काळात घाटामध्ये अत्यावश्यक वाहनांना वगळून एकेरी वाहतूक, मोटार वाहनांना प्रवेश बंदी, मार्ग वळविणे, नो पार्किंग, हॉल्टिंगचे नियोजन करण्यात आले आहे. वाहनचालक व भाविकांनी वाहतूक नियोजनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी केले आहे. यात्रेकरीता जाणारी सर्व वाहने केर्ली व कुशिरे फाटामार्गे जोतिबा डोंगरावर जातील व इतर सर्व मार्ग मोटार वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. केर्ली-कुशिरे गावावरून येणारी सर्व मोटार वाहने सामाजिक वनीकरण फाटा येथून गायमुखमार्गे जोतिबावर जातील. सर्व एस. टी. बसेस व अत्यावश्यक सेवेतील वाहने सामाजिक वनीकरण येथून दानेवाडीमार्गे जोतिबावर जातील. घाट उतरताना जोतिबा डोंगरावरील सर्व वाहने दानेवाडी फाट्यावरून वाघबिळ किंवा गिरोलीमार्गे कोल्हापूर व इतर ठिकाणी एक दिशामार्गे जातील. जोतिबा ते जुने आंब्याचे झाड या दरम्यानची वाहतूक दोन्ही मार्गांनी राहील. देवदर्शन घेऊन परत जाणाऱ्या वाहनचालकांनी गिरोली बाजूकडील एक दिशा मार्गाचा अवलंब करावा. वाघबिळ व शाहूवाडीकडून दानेवाडीमार्गे येणारी सर्व वाहने केर्लीमार्गे जोतिबावर जातील. माले, कोडोली, गिरोली, वाघबिळ हे मार्ग फक्त बाहेर जाण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. यामार्गे वाहनांना जोतिबावर जाण्यास प्रवेश बंदी आहे. भाविकांची सुरक्षा व मोटार वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी भाविकांनी डोंगरावर ये-जा करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. खासगी वाहनांचा वापर करणाऱ्या वाहनधारकांनी भाविकांना डोंगरावर सोडून आपली वाहने पन्हाळा डोंगरावरील उपलब्ध पार्किंग, केर्ली गावातील माळरान व हायस्कूल मैदान तसेच रजपूतवाडी-सोनतळी मैदान आदी ठिकाणी पार्किंग करावी. भाविकांनी व वाहनधारकांनी गैरसोय टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तांबडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. (प्रतिनिधी) अवजड वाहनांना ‘प्रवेश बंदी’

अवजड वाहने, ट्रक, तीनचाकी प्रवासी व माल वाहतूक रिक्षा तसेच ट्रॅक्टर यांना यात्रा कालावधीत जोतिबावर जाण्यास बंदी घालण्यात आल्याचे शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.