कोल्हापूर : पूर्वी अंबाबाईचे मंदिर हे केवळ स्थानिक भाविकांचे श्रद्धास्थान होते. गेल्या दहा-पंधरा वर्षांत देवीची महती देशभरात पोहोचल्याने भाविकांची संख्याही वाढली आहे. येथे आल्यानंतर भाविकांपुढे मोठा प्रश्न असतो तो पार्किंगचा. बिंदू चौकातील सबजेल हलवले गेले तर येथे प्रशस्त पार्किंग करता येईल. येथेच स्वच्छतागृहाची व्यवस्था केली तर भाविकांची मोठी सोय होणार आहे. मंदिराचा विकास करायचा म्हणजे येथे पिढ्यान्पिढ्या राहणारे नागरिक, व्यापारी यांना हलवावे लागणार. मात्र हे करीत असताना त्यांचे योग्य रीतीने पुनर्वसन करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. जमिनींचे हस्तांतरण आणि नागरिकांचे पुनर्वसन हा या आराखड्यातील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्याचाच खर्च मोठा आहे. नांदेडमध्ये ही प्रक्रिया योग्य रीतीने केली गेली; त्यामुळे त्यांच्यात तक्रारीचा सूर नाही. कोल्हापूरच्या नागरिकांची धरणग्रस्तांसारखी अवस्था होऊ नये. शाळांचेदेखील स्थलांतर करून त्यांना योग्य पर्याय दिला पाहिजे. मंदिराचे सौंदर्य अबाधित राखतानाच कमी खर्चात अधिक सुविधा कशा देता येतील, याचा विचार केला गेला पाहिजे.- आनंद माने, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सदर्शन मंडपाची गरज आहे का?अन्य देवस्थानांमध्ये केवळ मुख्य रांगांमधूनच देवतेचे दर्शन होते. कोल्हापूरच्या अंबाबाईचे मात्र महाद्वार, गरुड मंडप, कासव चौक अशा तीन-चार ठिकाणांहून सहज दर्शन घडते. शिवाय दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची ठरावीक कालावधीतच गर्दी असते. तेवढ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून दर्शन मंडप उभारण्याची खरंच गरज आहे का, याचा विचार व्हावा. मंदिर हे वारसास्थळ असल्याने त्या शेजारी कोणतीही नवी इमारत उभारता कामा नये. दर्शन मंडपासाठी परिसरातील इमारती ताब्यात घेता येऊ शकतील.झाकोळले भवानी मंडपाचे सौंदर्यजुना राजवाड्यासमोर आतील बाजूला शासकीय कार्यालये आहेत. ती हलवून तेथे भाविकांच्या विश्रांतीची सोय करता येईल. भवानी मंडपातून केएमटी हलवली. मात्र आता दुचाकी गाड्या, शासकीय गाड्या, फेरीवाले यांनी पूर्ण परिसर व्यापला आहे. हा परिसर ऐतिहासिक वारसा स्थळ असल्याने मोकळा पाहिजे.
सबजेल हलवून पार्किंग करावे
By admin | Published: June 17, 2016 12:11 AM