शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

शनिशिंगणापुरातील प्रकार मार्केटिंगचा भाग

By admin | Published: November 30, 2015 1:03 AM

मुक्ता दाभोलकर : मंदिराच्या चबुतऱ्यावर जाऊन महिलेने केलेली पूजा समानतेचाच अधिकार

शिवाजी गोरे -- दापोली --शनिशिंगणापूर मंदिराच्या चबुतऱ्यावर प्रवेश करून महिलेने पूजा करणे म्हणजे तिला घटनेने मिळालेला समानतेचा अधिकार आहे. परंतु महिलेने मंदिर प्रवेश केला म्हणून ते पवित्र करणे किंवा या घटनेला सुरक्षारक्षकाला जबाबदार धरून त्यांना निलंबित करणे या दोन्ही घटना निषेधार्ह आहेत. अशा अंधश्रद्धाळू घटनेचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती निषेध करीत असल्याचे अंनिसच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी ‘लोकमत’शी बोेलताना सांगितले.शनिशिंगणापूर देवस्थानाला अलीकडे महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी १९७० च्या दशकात अनेक महिलांनी मंदिराचा चबुतरा चढला होता. त्यावेळी या मंदिराला फारशी प्रसिद्धी नव्हती किंवा त्यावेळी सुरक्षारक्षकही नव्हते. परंतु, आता मात्र या मंदिराला महत्त्व प्राप्त झाल्याने आपण काहीतरी वेगळे करीत असल्याचा भास करून मार्केटिंग करण्यात येत असल्याची शक्यता आहे. महिलांनी मंदिर प्रवेश करणे हा तिला लाभलेला समान अधिकार आहे. परंतु, काहीतरी वेगळेपण दाखवून मार्केटिंग करण्यात येत आहे. समाजात प्रत्येकवेळी जेव्हा जेव्हा अशाप्रकारे घटना घडल्या आहेत, तेव्हा तेव्हा समाज-व्यवस्थेकडून खालच्या स्तरातील मंडळींचा बळी गेला आहे. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी या महिलेने हे धाडस का दाखविले, याचाही शोध घेणे गरजेचे आहे, असे यावेळी त्या म्हणाल्या.समाजातील चुकीच्या गोष्टींना विरोधाची गरजसमाजाला दीडशे, पावणेदोनशे वर्षांची समाजसुधारणेची परंपरा आहे. आज सर्व राजकीय पक्ष व महिला संघटनांनी एकत्र येऊन समाजातील चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याची गरज आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात महिलांच्या मासिक पाळीमुळे महिलांना प्रसाद तयार करण्याला बंदी घालण्यावरून सर्व राजकीय पक्षांनी विरोध केला होता. तशी भूमिका सर्व राजकीय पक्षांनी घेणे गरजेचे आहे. १५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शनिशिंगणापुरात सत्याग्रह करून न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. हायकोर्टात ही याचिका प्रलंबित आहे. या ठिकाणी महिलांना घटनेने दिलेल्या अधिकाराचा भंग होत आहे, ही गंभीर बाब आहे, असे त्या म्हणाल्या.