शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

कर्नाटकातील मराठा बांधवही होणार महामोर्चात सहभागी

By admin | Published: September 26, 2016 11:33 PM

आदल्या दिवशी मुक्कामाला : पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अन् रत्नागिरी जिल्ह्यांतूनही एकवटणार समाज

सातारा : मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यातील महामोर्चामध्ये लगतच्या पुणे, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरीसह सांगली जिल्ह्यांतून मराठा बांधव सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, सांगली जिल्ह्याच्या पूर्व टोकावर असणारी गावे, कर्नाटकात स्थायिक झालेले व सीमा भागात असणारे मराठा बांधव मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी होणार आहेत. या संदर्भात सोशल मीडियाद्वारे संदेश येऊ लागले आहेत. त्यामुळे सातारा महामोर्चा राज्यातील सर्वच मोर्चांची विक्रम मोडीत काढणार आहे.सातारा जिल्हा हा मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे संपूर्ण राज्याची या जिल्ह्यातील महामोर्चाबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. त्यानुसार महामोर्चाची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे.सीमावर्ती भागातून सातारा अंदाजे अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून यावे लागणार आहे. या महामोर्चात वेळेवर सहभागी होता यावे, यासाठी महामोर्चाच्या आदल्यादिवशीच रविवारी सातारा मुक्कामी येण्याचे साकडे नातेवाइकांकडून घातले जात आहे. महामोर्चा सोमवारी आहे. रविवारी सुटी असल्याने बहुतांश मराठा समाज बांधव महामोर्चाच्या आदल्यादिवशीच म्हणजे रविवारी साताऱ्यात मुक्कामी येणार आहेत. संभाव्य गर्दी लक्षात घेता एक दिवस अगोदर येणार सांगितले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या महामोर्चाच्या संदर्भात जनजागृतीही केली जात आहे. दूरध्वनी, मोबाईल करुन या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जात असून त्यांनाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.शेजारच्या पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी सोलापूर जिल्ह्यांतून पै-पाहुणे, मित्रमंडळी, नातेवाइकांशी सोशल मीडियाद्वारे महामोर्चात सामील होण्याची विणवणी केली जात आहे. कर्नाटकस्थित सीमा भागात स्थायिक झालेले मराठा बांधवही महामोर्चाच्या अनुषंगाने एकत्र येत आहेत. महाराष्ट्रात असणाऱ्या बांधवांच्या हाकेला प्रतिसाद देऊन ते पण या महामोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगत आहेत.या महामोर्चाच्या निमित्ताने एकमेकांचे गाठीभेटी होतील, यामुळे समाज बांधव एकत्र येताना दिसत आहे. साताऱ्याचा महामोर्चा ‘न भूतो न भविष्यती’करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)ही तर आमची बांधिलकी !महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातही मराठा बांधव मोठ्या प्रमाणात स्थायिक झाला आहे. विशेष करून कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील सीमाभागात मराठी बांधवांनी मराठ्यांच्या राजधानीत साताऱ्याच्या महामोर्चात सहभागी होणार असल्याचे सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले आहे. आम्ही कर्नाटकात राहत असलो तरी मराठा समाजाची आमची बांधिलकी आहे. समाज न्याय हक्कासाठी लढा देत असताना त्यांच्या पाठीशी राहून, त्यांची ताकद वाढविणे आमचेही कर्तव्य आहे. याच भावनेतून आम्ही कर्नाटक बांधवही या महामोर्चात सामील होणार आहे. - महादेव शिंदे, चडचण