इचलकरंजी : डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट, नवी दिल्ली या शिखर संघटनेने सोमवार, २८ जून रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. यामध्ये इचलकरंजीतील दी गुडस् ट्रान्सपोर्ट, वेअर हाऊस, लॉरी ऑपरेटर असोसिएशन, टेम्पो चालक - मालक कल्याणकारी असोसिएशन, दि मँचेस्टर ट्रक मोटर मालक संघ सहभागी होणार असल्याचा निर्णय संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
या दिवशी ट्रान्सपोर्टसंबंधी सर्व व्यवहार बंद ठेवून काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात येणार आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रांताधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे. यावेळी शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास २१ ऑगस्टनंतर देशव्यापी चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. या बैठकीला अशोक शिंदे, भरत चौधरी, जितेंद्र जानवेकर, सचिन जाधव, मिश्रीलाल जाजू, इसाक आवळे, आदी उपस्थित होते.