आजारपणामुळे आर्थिक अडचणीत येणाऱ्या कुटुंबांना मदत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या
महाराष्ट्र जनारोग्य महापरिक्रमेत विशाळगड ते पन्हाळा या मार्गावर इच्छुकांनी सहभागी व्हा, असे आवाहन घनश्याम केळकर यांनी केले आहे.
घनश्याम केळकर यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ही पायी परिक्रमा रायगड किल्ल्यापासून सुरू केली आहे. घरातील आजारपणामुळे आर्थिक अडचणीत येणाऱ्या कुटुंबांना मदत करण्यासाठीची व्यवस्था निर्माण करणे हा या परिक्रमेचा उद्देश आहे. रायगड व सातारा जिल्ह्यांचा प्रवास करून सध्या ते कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचले आहेत. त्यांचा आतापर्यंत ३५० कि.मी. पायी प्रवास पूर्ण झाला आहे. ते एकूण ४००० किमी प्रवास ३४४ दिवसांत पुर्ण करणार आहेत. दि. १२ ते १७ डिसेंबर या कालावधीत ते विशाळगड ते पन्हाळा ही परिक्रमा करणार आहेत.