शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
4
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
5
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
6
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
7
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
8
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
9
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
10
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
11
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
12
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
13
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
14
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
15
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
16
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
17
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
18
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
19
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
20
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 

१४५० चा पास फक्त ‘हजारात’

By admin | Published: January 06, 2015 12:21 AM

रंकाळा स्टँडमधील गैरव्यवहार : सरकारी कर्मचारीही बनले ‘विद्यार्थी’

कोल्हापूर : येथील रंकाळा स्टँडवर १४५० रुपयांऐवजी कामगारांना हजार रुपयांत विद्यार्थी सवलतीचा पास देऊन, प्रत्येक पासमागे दोनशे ते तीनशे रुपयांची कमाई केली जात असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. विशेष म्हणजे या ‘कमाई’च्या पासचा फायदा काही शासकीय कर्मचाऱ्यांनी घेऊन विद्यार्थी पासवर एस.टी.तून प्रवास केल्याचे समजते.एस.टी. महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना ६६.६६ टक्के सवलतीच्या दराने विद्यार्थी पास दिला जातो; तर कामगारांना २० दिवसांचे भाडे भरून ३० दिवसांचा प्रवास अशी सवलत आहे. साधारणपणे एका मार्गावर दरमहा १४५० रुपयांत मिळणारा कामगार पास, संबंधित व्यक्तीला तो विद्यार्थी पास असल्याचे दाखवून हजार ते अकराशे रुपयांत दिला जात होता. यामुळे पास घेणाऱ्याचेही २०० ते ३०० रुपये वाचत होते. पास देणाऱ्या व्यक्तीलाही प्रत्येक पासमागे २०० ते ३०० रुपये मिळत होते. एस.टी. महामंडळाचे पास देणारी व्यक्तीच अशा सवलतीच्या दरात पास देत असल्याने अनेकांनी हे पास घेण्याचे धाडस केले. निलंबित वाहतूक नियंत्रक रंजना पाटील यांनी आतापर्यंत दहा लोकांना असा पास दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गैरव्यवहाराची रक्कम जास्त नाही. शाळेचे मुख्याध्यापक किंवा महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी प्रमाणित केलेला विहीत अर्ज, सवलतधारकाचा फोटो, बोनाफाईड सर्टिफिकेट अशी कागदपत्रे जमा केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवास सवलतीचा पास दिला जातो. मात्र, या ठिकाणी या पाससाठी लागणारी सर्व बनावट कागदपत्रे जमा करून घेऊन संबंधितांनी हे पास दिल्याचे समजते. विद्यार्थी व कामगारांना सवलती पास देण्यासाठी वाहतूक नियंत्रक रंजना पाटील या फक्त एकट्या नसून, या प्रकरणी त्यांना आणखी कोणीतरी मदत करीत असल्याचा संशय महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.बिंग फुटले कशामुळे...रंजना पाटील यांचे पती एस.टी. खात्यातच नोकरीस होते, परंतु महामंडळातील नोकरभरतीत गैरव्यवहार प्रकरणात नाव आल्याने त्यांनी काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली. रंजना पाटील यांना अनुकंपाखाली सेवेत घेण्यात आले, परंतु त्यांच्या वागणुकीबद्दल तक्रारी होत्या. त्यातूनच गैरव्यवहाराचे बिंग फुटल्याची चर्चा आहे.पास सवलत..रंकाळा स्टॅँड येथून दर महिन्याला २५०० विद्यार्थी सवलतीचा पास घेऊन प्रवास करतात; तर ८०० जण कामगारांचा पास घेऊन सवलतीच्या दरात प्रवास करतात. २०० जण त्रैमासिक पास घेतात.