कोल्हापूर : नागरिकांची आग्रही मागणी आणि गरज लक्षात घेऊन केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी कोल्हापुरात पासपोर्ट सेवा केंद्र सुरूकरण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी जोरदार पाठपुरावा केला होता, त्याला यश आले आहे. या मंजुरीमुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे.याबाबतचे पत्र केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी खासदार महाडिक यांना पाठविले असून, पासपोर्ट सेवा केंद्राबाबत पाठपुरावा केल्याबद्दल महाडिक यांच्याच हस्ते उद्घाटन करावे, असे त्या पत्रात नमूद केले आहे. येत्या २५ मार्चला परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्वर मुळे, खासदार संभाजीराजे, खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन होणार आहे.कोल्हापुरात पासपोर्ट सेवा केंद्र सुरूव्हावे यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती. त्याबाबत कोल्हापुरात गेल्या वर्षभरात पासपोर्ट कार्यशाळाही घेण्यात आली. या पासपोर्ट कार्यशाळेस कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. पासपोर्ट सेवा आॅनलाईन असली तरीही कागदपत्रे आणि पडताळणीसाठी कोल्हापुरातील नागरिकांना पुण्याच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. त्यासाठी वेळ आणि पैसाही खर्च होत होता. त्यामुळे हे पासपोर्ट केंद्र कोल्हापुरात व्हावे यासाठी कोल्हापुरातून जनरेटाही वाढला होता. ही गरज लक्षात घेऊन खासदार महाडिक यांनी जोरदार पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. या सेवा केंद्रासाठी महाडिक यांनी संसदेतही आवाज उठविला होता.धनंजय महाडिक यांनी सुषमा स्वराज यांना प्रत्यक्ष भेटून या प्रश्नाची तीव्रता आणि निकड स्पष्ट केली होती. त्यामुळेच कोल्हापुरात मुख्य पोस्ट कार्यालयामध्ये हे पासपोर्ट सेवा केंद्र सुरूहोत आहे.कोल्हापुरातील पासपोर्ट कार्यालय बंद झाल्यापासून त्याचा नागरिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे हे कार्यालय कोल्हापुरात आवश्यकच होते. त्याबाबत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची अनेकवेळा प्रत्यक्ष भेट घेऊन त्याबाबत पाठपुरावा केला. त्यामुळे पोस्ट विभागाच्या साथीने हे सेवा केंद्र कोल्हापुरात सुरू करण्याबाबत त्यांनी मंजुरी दिली. लवकरच या केंद्राचे उद्घाटन करून सेवा सुरू करावी, असेही मंत्री स्वराज यांनी सुचविले आहे. - धनंजय महाडिक, खासदारवेळ, पैशाची बचतया मंजुरीमध्ये शिक्षण आणि व्यवसायासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या कोल्हापूरच्या नागरिकांची मोठी सोय झाली आहे. सध्या पासपोर्ट मिळण्यासाठी येथील नागरिकांना पुण्याला जावे लागत होते. मात्र, आता कोल्हापुरात पासपोर्ट सेवा केंद्र सुरूहोणार असल्याने नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.
पोस्टातील पासपोर्ट केंद्र २५ पासून
By admin | Published: March 14, 2017 12:42 AM