कोल्हापूर : शहरातील प्रमुख रस्ते आणि वाहतुकीच्या वर्दळीच्या रस्त्यांचे पॅचवर्क तत्काळ करण्याचे महापालिकेचे नियोजन असून यासाठी रस्ते आणि पॅचवर्क स्पॉट निश्चित करून काम युद्धपातळीवर हाती घ्या, अशी सूचना महापौर निलोफर आजरेकर यांनी केली.पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार शहरातील प्रमुख रस्त्यांचे पॅचवर्क दिवाळीपूर्वी पूर्ण होण्याच्या दृष्टीने महापौर आजरेकर यांनी स्थायी समिती सभागृहात पदाधिकारी, शहर अभियंता व सर्व उपशहर अभियंता यांच्यासमवेत बैठक आयोजित केली होती.महापौर आजरेकर म्हणाल्या, शहर अभियंता आणि उपशहर अभियंता यांनी आजच पॅचवर्कची ठिकाणे निश्चित करून तसा अहवाल द्यावा. रस्त्यांचे काम तसेच खड्डे मुजविण्यासाठी पॅचवर्कचे काम करताना ज्या ठिकाणी पाणीपुरवठा विभागाचे लिकेज आहेत, ते लिकेज काढून घेण्याबरोबरच ड्रेनेजचे काम असल्यास ते प्राधान्याने करून नंतरच पॅचवर्क करावे.स्थायी समिती सभापती सचिन पाटील म्हणाले, पॅचवर्कसाठी स्पॉट निश्चित करताना बारकाईने अभ्यास करून अतिशय गरजेच्या असणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील स्पॉट निश्चित करावेत. गटनेते शारगंधर देशमुख म्हणाले, पॅचवर्क कामी कसलीही हयगय करू नका तसेच ज्या रस्त्यांच्या मुदतीचा कालावधी (गॅरंटी पिरीयड)मध्ये रस्त्यांवरील पडलेले खड्डे मुजविणे आणि डागडुजी करणे हे काम संबंधित ठेकेदारांकडून करून घेण्याची सूचना त्यांनी केली.
वर्दळीच्या रस्त्यांचे पॅचवर्क युध्दपातळीवर करा : महापौर आजरेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:20 AM
Muncipal Corporation, kolhapurnews, roadsefty कोल्हापूर शहरातील प्रमुख रस्ते आणि वाहतुकीच्या वर्दळीच्या रस्त्यांचे पॅचवर्क तत्काळ करण्याचे महापालिकेचे नियोजन असून यासाठी रस्ते आणि पॅचवर्क स्पॉट निश्चित करून काम युद्धपातळीवर हाती घ्या, अशी सूचना महापौर निलोफर आजरेकर यांनी केली.
ठळक मुद्देवर्दळीच्या रस्त्यांचे पॅचवर्क युध्दपातळीवर करा : महापौर आजरेकरपदाधिकारी, शहर अभियंता व सर्व उपशहर अभियंता यांच्यासमवेत बैठक