शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

‘सीपीआर’मधील रुग्णाला, रक्तदात्याला मोफत रक्त

By admin | Published: June 15, 2017 1:00 AM

रक्तपेढीचा उपक्रम : नातेवाईकांनाही फायदा; रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘जागतिक रक्तदाता दिन’ म्हणून १४ जून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. सीपीआर रुग्णालयातील रक्तपेढीकडे सुमारे १० हजार युनिट वार्षिक रक्तसंकलन होत आहे. त्यामुळे येथून पुढे ‘सीपीआर’मधील कोणत्याही रुग्णाला हे रक्त विनामूल्य दिले जाणार आहे. ‘सीपीआर’मध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला अगर त्याच्या नातेवाइकालाही गरजेनुसार रक्त विनामूल्य देण्यात येणार असल्याची माहिती राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व सीपीआर रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संदीप साळोखे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून येथील सीपीआर रुग्णालयाच्या रक्तपेढीमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन केल्याचे सांगून डॉ. रामानंद व डॉ. साळोखे म्हणाले, ‘रक्त द्या, आत्ताच द्या, सतत द्या,’ हे या वर्षीचे घोषवाक्य आहे. रक्तपेढी ही संस्था केवळ रक्तदात्यांमुळेच अस्तित्वात राहू शकते; कारण मानवी रक्ताला अजूनही पर्याय उपलब्ध झालेला नाही. ‘सीपीआर’मधील रक्तपेढीचे संकलन दिवसेंदिवस वाढत आहे. वार्षिक सुमारे दहा हजार युनिट रक्तसंकलन होत आहे. तसेच सर्व रक्तथैल्यांचे विघटन क्रियेमार्फत प्लेटलेट व प्लाझ्मा काढत असल्यामुळे एका रक्तथैलीचा निरनिराळ्या तीन रुग्णांना उपयोग होत आहे. डेंग्यू, मलेरिया, कॅन्सर, गुंतागुंतीचे बाळंतपण, आदी गंभीर आजारांवर रक्तघटक व त्याची उपलब्धता या रक्तपेढीमार्फत केली जाते. नेहमी रक्त देणाऱ्या रक्तदात्यांमुळे कायम व वेळेत सुरक्षित रक्तपुरवठ्याचीही हमी आपणा सर्वांना मिळणार आहे; कारण त्यांची सर्वसाधारण आरोग्य चाचणी उत्कृष्ट व होकारात्मक असल्यावरच त्यांचे रक्त घेतले जाते व ते सर्व जंतुसंसर्गविरहित असे निष्कलंक असल्याची खात्री आपणा सर्वांना मिळते, असेही डॉ.साळुंखे यांनी सांगितले.रुग्ण घरी असो की दवाखान्यात आणि त्यास रक्ताची गरज लागल्यास तुम्ही फक्त डायल करा.. फोन नंबर १०४. या सेवांतर्गत कोठूनही फोन केल्यास सीपीआर रक्तपेढीतून त्वरित दुचाकीवरून व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन, रुग्णाचे रक्तनमुने व मागणीपत्र जमा करून घेऊन, रक्तपेढीत येऊन, त्यावर मॅचिंगची प्रक्रिया करून परत हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी रक्त पोहोचविण्याची व्यवस्था करतो. त्यासाठी दोन मोटारसायकलस्वार सज्ज आहेत. रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना जेव्हा रक्ताची तातडीची गरज असते तेव्हा तणावात असताना रिक्षातून रक्तपेढ्या शोधत फिरण्यापेक्षा ही सोय खूप मोलाची ठरते. ही सेवा २४ तास उपलब्ध आहे.‘सीपीआर’मध्ये रक्तदान कराखासगी रक्तपेढीपेक्षा ‘सीपीआर’च्या रक्तपेढीमध्ये रक्तदान करावे; कारण रक्तदानानंतर त्याला दिलेल्या कार्डवर त्या रक्तदात्याला अगर त्याच्या नातेवाईक रुग्णाला गरजेच्या वेळी विनामूल्य रक्तपुरवठा करता येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.