रिपब्लिकन पक्षाचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रंकाळा येथील एका खासगी रुग्णालयात कोरोना उपचार घेतलेल्या जयसिंग पूर येथील रुग्णाचा बिलासाठी छळ करण्यात येत असून, त्यांना डांबून ठेवल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाने केला आहे. या रुग्णालयावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे करण्यात आली.
पक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जयसिंगपूर येेथील एका रुग्णाला कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. व्हेंटिलेटरसह १ लाख ६० हजारापर्यंत खर्च येईल असे रुग़्णालयाकडून सांगण्यात आले. नंतर व्हेटिलेटरचे दररोज २२ ते २५ हजार रुपये होतील, अन्यथा रुग्णाला घरी घेऊन जा असे सांगितले. त्यावर दीड लाख रुपये डिपॉझिट म्हणून भरायला लावले. रुग्णांची प्रकृती ठिक झाल्यानंतर २१ तारखेला त्याला डिसचार्ज देण्यात आला. त्यानंतर २ लाख २५ हजार रुपये दवाखान्याचे आणि ६५ हजार औषधांचे झाले आहेत, ते भरा आणि त्यानंतरच रुग्णाला घेऊन जा, असे म्हणत गेली चार दिवस रुग्णाला डांबून ठेवले आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, जयपाल कांबळ, शरद कांबळे, राहूल कांबळे, प्रदीप मस्के, भारत जमणे, संतोष निकाळजे आदी उपस्थित होते.
--
फोटो कोलडेस्कला rpi निवेदन नावाने पाठवला आहे.
ओळ : बिलासाठी रुग्णाचा छळ करत असलेल्या खासगी रुग्णालयावर कारवाई करावी यासाठी कोल्हापुरातील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देण्यात आले.