इचलकरंजी : राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेत साई नाट्यधारा चंदगड या संस्थेच्या ''पॉज'' या एकांकिकेने प्रथम क्रमांक मिळविला तसेच आम्ही पुणे या संस्थेच्या ''लव इन रिलेशनशीप'' या एकांकिकेने द्वितीय, तर सांगली या संस्थेच्या ''समांतर'' या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला. मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलने या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
स्पर्धेमध्ये परसू गावडे (पॉज), प्रणव जोशी (लव्ह इन रिलेशनशीप), मोनिका बनकर (दोरखंड), पुरुष अभिनयासाठी अपूर्व स्वराज (दोरखंड), परसू गावडे (पॉज), सागर बंडगर (हलगीसम्राट), स्त्री अभिनयासाठी वैशाली पाटील, नीतू साहनी, शुभांगी जाधव यांना वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तांत्रिक विभागात रोहन घोरपडे, अमित साळुंखे, संदेश खेडेकर, श्याम चव्हाण, अविष्कार ठाकूर, यशोधन गडकरी, अक्षय सुतार, वंदना गणू यांना पुरस्कार मिळाला.
पारितोषिक वितरण समारंभ रंगकर्मी संजय हळदीकर व रोटरीचे सहायक प्रांतपाल मनीष मुनोत यांनी केले. स्पर्धेत ४२ संघांनी एकांकिका सादर केल्या. संजय होगाडे यांनी प्रास्ताविक केले. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास समीर गोवंडे, शामसुंदर मर्दा, संजयसिंह गायकवाड, रसिक उपस्थित होते. पंडित ढवळे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष आबाळे यांनी आभार मानले.
(फोटो ओळी)
०१०१२०२१-आयसीएच-०१
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत साई नाट्यधारा चंदगड या संस्थेच्या ''पॉज'' या एकांकिकेने प्रथम क्रमांक मिळविला. संघास मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.