शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 11:50 AM

HasanMusrif Kolhapur : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी व्हीसीद्वारे बैठक घेवून तोडगा काढल्याने पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचा मार्ग मोकळा झाला. गेल्या पाच वर्षातील जिल्हा परिषद खर्चाचे लेखे अद्ययावत केल्याशिवाय पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे १३३७ कोटी रुपये पडून होते. याबाबत २० जूनला लोकमतने वृत्त दिले होते.

ठळक मुद्देपंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचा मार्ग मोकळा लोकमत बातमीचा परिणाम, मुश्रीफांकडून तातडीने बैठक, व्हीसीद्वारे सर्व सीईओंना सूचना

समीर देशपांडे कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी व्हीसीद्वारे बैठक घेवून तोडगा काढल्याने पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचा मार्ग मोकळा झाला. गेल्या पाच वर्षातील जिल्हा परिषद खर्चाचे लेखे अद्ययावत केल्याशिवाय पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे १३३७ कोटी रुपये पडून होते. याबाबत २० जूनला लोकमतने वृत्त दिले होते.पाचही वर्षीतील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने केलेल्या खर्चाचे सर्व लेखे अद्ययावत करण्यापेक्षा प्रत्येक महिन्याची जमा आणि खर्च अद्ययावत करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. साठ महिन्यांचा जमा-खर्च अद्ययावत केल्यानंतर पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यासाठी पीएफमएमएस प्रणालीतून शक्य होणार आहे. यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

व्हीसीच्या माध्यमातून हा पर्याय सर्व जिल्हा परिषदांना कळवण्याचे आदेश मुश्रीफ यांनी दिले. त्यानुसार मंगळवारी दुपारी चार वाजता ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, वित्तचे उपसचिव प्रवीण जैन यांनी सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची व्हीसीद्वारे बैठक घेऊन त्यांना पर्याय दिला.पंधराव्या वित्त आयोगातून निधी खर्च करताना आधीचे पाच वर्षांच्या खर्चाचे सर्व लेखे पूर्ण करण्याचा पीएफएमएस प्रणालीमध्ये संदेश येत होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर शिल्लक असलेले लेख अद्ययावत करण्यासाठी मनुष्यबळही उपलब्ध नव्हते. काही कंत्राटी संगणक परिचालक घेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु हे काम लवकर उरकणारे नव्हते.

हा निधी वेळेत खर्च झाला नाही तर मिळणाऱ्या प्रोत्साहनात्मक अनुदानावरही पाणी सोडावे लागले असते. मुश्रीफ यांनी कोणत्याही स्थितीमध्ये यातून मार्ग काढा, कोरोना काळात इतका निधी शिल्लक असताना केवळ तांत्रिक अडचणीमुळे तो शिल्लक राहता कामा नये अशा सूचना दिल्या. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर