घन:शाम कुंभार।यड्राव : प्रदुषण समस्यावर सामाजिक दृष्टीकोनातून संशोधन केल्यास पर्याय निघू शकतो आणि समाजमान्य ठरतो हे शरद इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचºयापासून पर्यावरणपूरक पेव्हिंग ब्लॉक निर्माण करून प्लास्टिक मुक्तीवर पर्याय शोधला आहे. तयार केलेले पेव्हिंग ब्लॉक सिमेंट पेव्हिंग ब्लॉकच्या तुलनेत दर्जेदार आहेत. याचा वापर शरद इन्स्टिट्यूटने केला आहे.
सध्या निवासस्थान कार्यालय परिसर सुशोभिकरणासाठी पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येत आहे. याकरिता लागणारी वाळू व इतर साहित्याचा होणारा तुटवडा तसेच प्लास्टिक प्रदुषणामुळे पर्यावरणासह सजीव सृष्टीवर होणारे विपरीत परिणाम यामुळे प्लास्टिक कचरा ही एक समस्या बनली आहे. या समस्येचा सखोल अभ्यास करून त्यावर पर्याय शोधण्याच्या संकल्पनेतून प्लास्टिक कचºयापासून पेव्हिंग ब्लॉक तयार करण्याची योजना शरद इन्स्टिट्यूटच्या सिव्हील विभागातील अक्षय पाटील, शुभम रेंदाळे, प्रथमेश वाणी, कपिल गिरंगे या विद्यार्थ्यांनी कृतीत उतरवली. यासाठी प्रा.एम.एच.गोता यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांनी प्लास्टिक पिशव्या, सिमेंटची रिकामी पोती, यासह विविध प्रकारचा प्लास्टिक कचरा गोळा करून तो वितळून घेतला. त्याचे वेगवेगळ्या आकारांमध्ये ब्लॉक तयार करून घेतले. त्यानंतर त्यांच्यावर विविध प्रकारच्या चाचण्या घेतल्या. यामध्ये ब्लॉक फुटत नाहीत. ते ७० टनांपर्यंत वजन पेलू शकतात. सिमेंट ब्लॉकच्या तुलनेत ते हलके आहे. हाताळणी व बसविण्यासाठी सुलभता आहे. त्याचप्रमाणे प्लास्टिकचे ब्लॉक पुन्हा वितळवून त्याचा पुनर्रवापर करता येणार आहे, असे पर्यावरणपूरक पेव्हिंग ब्लॉक चाचणीमध्ये यशस्वी ठरल्याने त्याचा वापर कॉलेजमध्ये करण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे प्लास्टिक कचºयाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यामुळे प्रदूषणमुक्ती होऊन जमिनीसह विविध सजीवांवर त्याचा चांगला परिणाम होणार आहे. या प्रोजेक्टची दखल पवई येथील आयआयटीमध्ये घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे राष्ट्रीयस्तरावरील ‘जिज्ञासा २०१८’ व ‘इनोव्हेशन २०१८’ या स्पर्धेत या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला आहे. +यड्राव (ता. शिरोळ) येथील विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचºयापासून बनविलेले पेव्हिंग ब्लॉक महाविद्यालयात बसविण्यात आले आहेत. +