शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

‘एक खिडकी’मुळे मंडप परवाना सुलभ

By admin | Published: September 12, 2015 12:12 AM

३६५ मंडळांनी घेतली परवानगी : गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने कार्यकर्त्यांची गर्दी - आले गणराया

कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सवाप्रसंगी उभारण्यात येणारे मंडप आणि ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यावतीने पोलीस उपअधीक्षक कार्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या ‘एक खिडकी’ योजनेतून शुक्रवारी सायंकाळपर्यंत कोल्हापुरातील ६४१ नोंदणीकृत मंडळांपैकी ३६५ मंडळांनी मंडप उभारणीचा परवाना नेला असून, या एक खिडकी योजनेमुळे अनेक मंडळांनी समाधान व्यक्त केले आहे. गणेशोत्सवात विविध पोलीस ठाणी व महापालिकेच्या संबंधित विभागांमध्ये शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या परवाना घेण्यासाठी रांगाच्या रांगा लागलेल्या असत. यंदा मात्र महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आणि जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या वतीने एकाच ठिकाणी सर्व परवान्यांसाठी ना-हरकत दाखले देण्याचे काम ‘एक खिडकी’ योजनेतून जुना बुधवार पेठेतील शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालय येथे सुरू केले आहे. त्यामुळे अमुक एक कागद राहिला म्हणून कार्यकर्त्यांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नाहीत. महापालिकेच्या शिवाजी मार्केट, गांधी मैदान, ताराराणी मार्केट आणि राजारामपुरी विभागीय कार्यालयांचे प्रतिनिधी या एक खिडकी योजनेत सामील झाले आहेत. याशिवाय पोलीस प्रशासनाने १ सप्टेंबरपासूनच कोल्हापूर शहरांतर्गत येणाऱ्या राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, जुना राजवाडा या पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती येथे केली आहे. त्यामुळे मंडळांना तत्काळ परवाना देण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी पोलीस ठाण्यांतर्गत शाहूपुरी - ९०, राजारामपुरी - ११५, लक्ष्मीपुरी- ६०, जुना राजवाडा- १०० असे ३६५ मंडळांना ना-हरकत दाखले दिले; तर महापालिकेकडूनही तितक्याच मंडळांना मंडप उभारणीचा परवाना देण्यात आला आहे. चार खांबांच्या मंडप उभारणीसाठी चार खड्डे असे म्हणून प्रत्येक मंडळाकडून २५० रुपये प्रतिखड्डा अशी अनामत रक्कम भरून घेण्यात आली आहे. एकाच छताखाली उभारण्यात आलेल्या एक खिडकी योजनेमुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांचे हेलपाटे वाचल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.प्रशासनाने मंडळांच्या कार्यकर्त्यांचा विचार करून प्रत्येक शासकीय खात्यात ना-हरकत दाखल्यांसाठी हेलपाटे न मारायला लावता एकाच ठिकाणी ‘एक खिडकी’ योजना सुरू करून कोल्हापुरातील तमाम मंडळांना दिलासा दिला आहे. याशिवाय तत्काळ परवाना पद्धतीने तर गणपतीच पावला, असे म्हणावे लागेल.हैदर देसाई, सचिव, क्रांतिसिंह तरुण मंडळ, स्वातंत्र्यसैनिक वसाहत, कोल्हापूर