कोल्हापूर : राज्यात सर्कस आहे, त्यात प्राणीही आहेत, असे सांगणाऱ्या शरद पवार यांनी राज्यात सर्कस असल्याचे मान्य केले, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह व पवार यांच्या वादात उडी घेतली.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी माध्यमांशी ते बोलत होते. महाराष्ट्रात सध्या सर्कस सुरू आहे, अशी टीका राजनाथसिंह यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यावर पवार यांनी सर्कस आहे, प्राणी आहेत; मात्र विदूषकाची कमतरता आहे, असा टोला लगावला होता. त्या वादात उडी घेत पाटील यांनी पवार यांनी सर्कस असल्याचे मान्य केल्याचे स्पष्ट केल्याचे सांगितले.पवार यांच्या कृषी, साखर उद्योगातील ज्ञानाबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. मी त्यांच्याबद्दल बोलत असतो याच अर्थ त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर नाही, असे होत नाही. मी याआधीही दिल्लीत अनेकदा त्यांची भेट घेतली आहे, असे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार असल्याने राजनाथसिंह यांनी सर्कस असा उल्लेख केला असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
राज्यात सर्कस आहे, हे पवार यांनाही मान्य, चंद्रकांत पाटील यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 2:21 PM
राज्यात सर्कस आहे, त्यात प्राणीही आहेत, असे सांगणाऱ्या शरद पवार यांनी राज्यात सर्कस असल्याचे मान्य केले, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह व पवार यांच्या वादात उडी घेतली.
ठळक मुद्दे राज्यात सर्कस आहे, हे पवार यांनाही मान्य, चंद्रकांत पाटील यांचा टोला म्हणे, पवार यांच्याबध्दल आदरच