गडहिंग्लज : २००९ मध्येच शरद पवारांनीकोल्हापूरकरांचा स्वाभिमान डिवचला तर काय होते, याचा अनुभव घेतला होता. त्यातून बोध घेण्याऐवजी यावेळीही त्यांनी जिल्ह्याच्या स्वाभिमानाला हात घातला. म्हणूनच स्वाभिमानी कोल्हापूरकरांनी यावेळी इतिहासाची पुनरावृत्ती केली. जिल्हा आता युतीचा बालेकिल्ला बनला असून त्यांनी आता कोल्हापूरचा स्वाभिमान ध्यानात ठेवावा, असा टोला शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना हाणला.
येथील पालिकेच्या शाहू सभागृहात शिवसेना-भाजप युतीतर्फे आयोजित आभार मेळाव्यात ते बोलत होते. ठरलेलं करून दाखविलेले काँगे्रसचे आमदार सतेज पाटील यांच्यासह भरभरून मते दिलेल्या स्वाभिमानी जनतेचे त्यांनी आभार मानले.मंडलिक म्हणाले, गडहिंग्लजच्या औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योगधंदे आणण्याबरोबरच हद्दवाढीनंतर शहरात समाविष्ट उपनगरांचा विकास आणि तालुक्याच्या पूर्वभागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न राहतील.
सर्व जागांवर युतीचे उमेदवार निवडून येतीलजिल्हा आता युतीचा बालेकिल्ला बनला आहे. येत्या विधानसभेला जिल्ह्यातील सर्व जागांवर युतीचे उमेदवारच निवडून येतील, असा दावा मंडलिक यांनी यावेळी केला.कागल, चंदगड युतीकडेचआगामी विधानसभा निवडणुकीत ‘कागल’ आणि ‘चंदगड’ या दोन्ही मतदारसंघातदेखील युतीचेच उमेदवार विजयी होतील, असे भाकितही मंडलिक यांनी यावेळी केले. ‘कागल’च्या आमदारकीबद्दल त्यांनी केलेल्या टिप्पणीची चर्चा झाली.