शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

यंत्रमाग क्षेत्राच्या ऊर्जितावस्थेसाठी लक्ष द्या

By admin | Published: August 26, 2016 10:59 PM

यंत्रमाग क्षेत्रातील संघटनांची मागणी : शासनाने एक कोटी जनतेकडे लक्ष देण्याची गरज

राजाराम पाटील -- इचलकरंजी --वस्त्रोद्योगात असलेली अभूतपूर्व मंदी, केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष यामुळे सुलभ रोजगार देणारा यंत्रमाग उद्योग अडचणीत आला आहे. देशात असलेल्या एकूण यंत्रमागांपैकी निम्म्याहून अधिक साडेबारा लाख यंत्रमाग महाराष्ट्रात असून, त्यापासून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष एक कोटी लोकांना रोजगार मिळतो. अशा स्थितीत यंत्रमाग उद्योगाकडे राज्य शासनाने विशेष लक्ष देण्याची मागणी या क्षेत्रातील संघटनांची आहे.महाराष्ट्रामध्ये विकेंद्रित क्षेत्रात असलेल्या यंत्रमाग उद्योगामध्ये इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव, सोलापूर, माधवनगर-विटा, येवला अशी ठळक यंत्रमाग केंद्रे आहेत. अशा यंत्रमाग केंद्रांमधून विविध प्रकारचे कापड व वस्त्र प्रावरणे यंत्रमागावर उत्पादित होतात. राज्यात यंत्रमाग उद्योग हा एकमेव उद्योग असा आहे की, अत्यंत कमी भांडवली खर्चामध्ये तो सुलभ रोजगार देतो. त्याचप्रमाणे राज्य शासन आणि केंद्र सरकार या दोघांनाही कर रूपाने महसूल मिळवून देतो. तसेच निर्यातीत दर्जाचे कापड यंत्रमागावर उत्पादित होत असल्याने परकीय चलनसुद्धा मिळवून देणारा हा उद्योग आहे.कापड उद्योगामध्ये जागतिक तेजी-मंदी, तसेच देशांतर्गत बाजारामधील तेजी-मंदी यांचा परिणाम या उद्योगावर ताबडतोब दिसून येतो. अशा प्रकारची बाजारात उत्पन्न होणाऱ्या अस्थिरतेचा परिणाम यंत्रमाग उद्योगाने यापूर्वी अनेकवेळा सोसला आहे. २0 व्या शतकाच्या उंबरठ्यावर जागतिकीकरणाचे वारे वाहत असताना त्यावेळी वस्त्रोद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर आलेल्या मंदीचा फटका आपल्या देशातील वस्त्रोद्योगाला बसला. यंत्रमाग उद्योगसुद्धा त्यावेळेला एकदम मोडकळीला आला. म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तेव्हाचे वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून यंत्रमाग उद्योगाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी शिफारस अहवाल देण्यास सांगितले.मंत्री आवाडे यांच्या समितीने त्यावेळी यंत्रमाग उद्योगासाठी २३ कलमी पॅकेज योजनेची शिफारस केली. हा शिफारस अहवाल शासनाने स्वीकारला आणि याशिवाय केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योगासाठी असलेल्या तांत्रिक उन्नयन योजनेचा (टफ्स) लाभ सुद्धा महाराष्ट्रातील यंत्रमाग क्षेत्रास दिला. त्यामुळे सन २००४-०५ नंतर राज्यातील यंत्रमाग उद्योगास पुन्हा भरभराटी आली. याच काळामध्ये इचलकरंजीसारख्या यंत्रमाग केंद्रात दहा हजारांहून अधिक शटललेस लुम्सचे कारखाने सुरू झाले. मात्र, अलीकडील वर्षभरामध्ये यंत्रमाग उद्योगाला पुन्हा भयानक मंदीने ग्रासले आहे. त्यामुळे यंत्रमाग उद्योगाला आता पुन्हा ऊर्जितावस्था मिळावी म्हणून केंद्र सरकार व राज्य शासनाकडे या क्षेत्रातील संघटनांनी साकडे घातले आहे. केंद्र सरकारकडून अपेक्षाबाहेरील देशांमधील कापड आयात करण्यासाठी असलेल्या करामध्ये वाढ करावी. विशेषत: चीन, बांगलादेश अशा देशांतील कापड व तयार कपडे आयातीसाठी १५ टक्के अ‍ॅन्टी डंपिंग ड्युटी आकारावी.टफ्स योजनेमध्ये यंत्रमाग क्षेत्राचा सहभाग करून या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान यंत्रमाग उद्योजकाला द्यावे. त्याचबरोबर नव्याने स्थापित होणाऱ्या टेक्स्टाईल पार्कमध्ये यंत्रमागासाठी समूह वर्क शेड योजना राबविण्याचे बंधन घालावे. यंत्रमागामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे.