महापालिका परिवहन विभाग (के.एम.टी) मधून २०१६ नंतर १५० हून अधिक चालक, वाहक आदी कर्मचारी सेवानिवृत्त झाले. विभागाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्याने सेवानिवृत्तीची देयके देण्याचे ठरविले आहेत. याबाबत प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मार्चमध्ये सकारात्मक चर्चाही झाली. त्यांनी ही देयके एप्रिल, मे, जून या कालावधीत देण्याचे मान्यही केले; परंतु ती त्या देयकांपैकी एकही पैसा सेवानिवृत्तांना मिळालेला नाही. त्यामुळे अनेकांना अर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातील अनेकजण सेवानिवृत्तीनंतर मयत झाली आहेत. त्यांना आयुष्यभर कष्ट करून जमविलेली पुंजी पाहताही आली नाही. त्यामुळे प्रशासकांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे सेवानिवृतांच्या देय रक्कमा त्वरित त्यांच्या खात्यावर जमा कराव्यात. अशी मागणी या संघटनेकडून होत आहे.
कोट
के.एम.टी. तून २०१६ नंतर १५० हून अधिक जण सेवानिवृत्त झाले. त्यांना विभागाकडून सुमारे दोन कोटी रुपयांचे देयके येणे आहेत. याबाबत प्रशासनाशी चर्चा झाली होती. त्याप्रमाणे देयके द्यावीत.
- प्रकाश पाटील, अध्यक्ष, के.एम.टी.कामगार सेवानिवृत्त कामगार संघटना