जयसिंगपूर : महा ई स्कॉलच्या अंतर्गत २०१२ पासून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामधील सोळा कोटी रक्कम थकीत आहे. ही रक्कम त्वरित जमा करावी, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्यावतीने कोल्हापूर जिल्हा समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विकास लोंढे व सांगली जिल्हा समाजकल्याण सहाय्यक आयुक्त बन्ने यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सन २०१२ पासून ईबीसी सवलतीची रक्कम प्रलंबित आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ९ कोटी रुपये व सांगली जिल्ह्यात ७ कोटी प्रलंबित आहेत. मात्र अजूनही महा डीबीटीअंतर्गत प्रादेशिक आयुक्तांकडून २०१९ पासूनची थकीत स्कॉलरशीपचा काहीच पाठपुरावा केलेला नाही. स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून वेळोवेळी यासंदर्भात मागणी केली होती तरीही अद्यापही प्रशाननाने दखल घेतलेली नाही. तातडीने विद्यार्थ्यांची फी जमा करावी, अन्यथा स्वाभिमानी विद्यार्थी परिषद रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा सौरभ शेट्टी यांनी यावेळी दिला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष पवन देसाई, उपाध्यक्ष अक्षय खोत, स्वप्निल चौगुले, शुभम मोरे, कैलास पोमाजे उपस्थित होते.
फोटो - १५०१२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ - स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्यावतीने समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विकास लोंढे यांना निवेदन देण्यात आले.