शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
3
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
4
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
5
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
6
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
7
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
8
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
9
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
10
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
12
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
13
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
14
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
15
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
16
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
17
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
18
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
19
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
20
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

पोलिसांना भरा आता तब्बल २१ लाख रुपये दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 12:46 PM

लॉकडाऊनच्या काळात विनाकारण शहरातून फिरणाºया दुचाकींवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत २५ मार्च ते ३ मे यादरम्यानच्या काळात कारवाई करीत सुमारे सात हजार दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. त्यांतील शहरांतर्गत ताब्यात घेण्यात आलेल्या दुचाकी मूळ मालकांना कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर, क्रेनचे १०० रुपये व २०० रुपये दंड असे प्रत्येकी ३०० रुपये भरून परत

ठळक मुद्देनशीब दंडावरच चूक निभावतेयय...विनाकारण फिरणाऱ्यांकडून २१ लाखांचा दंड वसूल होणारसुमारे सात हजार दुचाकी ताब्यात; चार मेपासून मूळ मालकांना कागदपत्रे पाहून दुचाकी परत मिळणार

कोल्हापूर : कोरोना विषाणू्च्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी सरकारने संचारबंदी व लॉकडाऊन केले होते. त्यात विनाकारण फिरणाºया सुमारे सात हजार दुचाकी शहर वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्या ४ मेपासून ३०० रुपये इतका दंड भरून व कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर मूळ मालकांच्या ताब्यात दिल्या जाणार आहेत. त्यामुळे सुमारे २१ लाखांचा दंड वसूल होणार आहे. ज्यांचा विमा, वाहन चालविण्याचा परवाना, आदी कागदपत्रांची पूर्तता नसणार आहे, त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात विनाकारण शहरातून फिरणाºया दुचाकींवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत २५ मार्च ते ३ मे यादरम्यानच्या काळात कारवाई करीत सुमारे सात हजार दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. त्यांतील शहरांतर्गत ताब्यात घेण्यात आलेल्या दुचाकी मूळ मालकांना कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर, क्रेनचे १०० रुपये व २०० रुपये दंड असे प्रत्येकी ३०० रुपये भरून परत दिल्या जाणार आहेत. याकरिता शहर वाहतूक शाखेतर्फे वाहन ताब्यात घेतल्यानंतर नोंदणीनुसार वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ही वाहने ४ मे ते १३ मे २०२० दरम्यान दोन प्रहरांत अर्थात सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत व दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत परत दिली जाणार आहेत, अशी माहिती पत्रकाद्वारे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.----------दुचाकी परत देण्याचे वेळापत्रक असे,(वाहन रजि. क्रमांकानुसार) ४ मे- ०००१ ते ०५००, ०५०१ ते १०००), ५ मे - १००१ ते १५००, १५०१ ते २०००, ६ मे -२००१ ते २५००, २५०१ ते ३०००, ७ मे - ३००१ ते ३५००, ३५०१ ते ४०००, ८ मे - ४००१ ते ४५००, ४५०१ ते ५०००, ९ मे- ५००१ ते ५५००, ५५०१ ते ६०००, १० मे- ६००१ ते ६५००, ६५०१ ते ७०००, ११ मे- ७००१ ते ७५००, ७५०१ ते ८०००, १२ मे - ८००१ ते ८५००, ८५०१ ते ९०००, १३ मे - ९००१ ते ९५००, ९५०१ ते ९९९९ .वाहने जमा असलेली ठिकाणेपोलीस मुख्यालय (मोटार वाहन विभाग), जैन बौर्डिंग, शहर वाहतूक शाखेशेजारी, चित्रदुर्ग मठ, दसरा चौक, महालक्ष्मी जिमखाना, शहाजी कॉलेज, शहर वाहतूक शाखा, दसरा चौकही कागदपत्रे आवश्यकआर. सी. नोंदणी (आर.सी.), लायसेन्स, विमा (इन्श्युरन्स), वाहन ताब्यात घेण्यासाठी बाँड पेपर आणि दंडाची रक्कम, आदींची पूर्तता केलेली पावती त्या-त्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दाखविल्यानंतर वाहने ताब्यात दिली जाणार आहेत. उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtraffic policeवाहतूक पोलीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस