शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या

By admin | Published: January 04, 2017 1:12 AM

शेतमजुरांची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

कोल्हापूर : शेतमजुरांना किमानवेतन कायद्यानुसार वेतन मिळावे. रोजगार हमी योजनांची कामे मिळावीत. बेघरांना घरकुल योजनेनुसार घरे व घरासाठी जागा मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेतमजूर महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. कोल्हापूर जिल्हा शेतमजूर युनियनच्या नेतृत्वाखाली त्यांनी हे आंदोलन केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात सकाळी दहा वाजल्यापासून शेतमजूर महिला आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मारला. त्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. यावेळी त्यांना युनियनचे जनरल सेक्रेटरी दिलीप पवार, अध्यक्ष सुशीला यादव, डॉ. मेघा पानसरे, बाबा यादव आदींनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील शेतमजुरांच्या मागण्यांबाबत संघटनेतर्फे निवेदने, निदर्शने, मोर्चा, प्रत्यक्ष चर्चा करूनही शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतमजुरांना योजनेचा लाभ घेता आलेला नाही. नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतमजुरांची आर्थिक कोंडी झाली. शैक्षणिक व आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रलंबित प्रश्न लवकर सोडवावेत, अशा मागणी आंदोलनकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली. आंदोलनात सुनीता वाघवेकर, कमल नाईक, माया जाधव, वैशाली तांदळे, शोभा नवले, शोभा पाटील, मालती कुरणे, लीला नागावे, मेघा चव्हाण, सुषमा हराळे, मंगल हांडे, दीपाली पाटील, मेहराजबी मोमीन, सरिता कांबळे, रंजना पोवार, एस. बी. पाटील, एम. बी. पडवळे, आदींसह ५०० हून अधिक शेतमजूर महिला सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)निवेदन स्वीकारले नाहीजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेनुसार आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी गेलो. मात्र, ते दुसऱ्या बैठकीसाठी निघून गेले. शिवाय त्यांनी अन्य अधिकाऱ्यांद्वारेदेखील निवेदन स्वीकारले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाच्या प्रवेशद्वाराला निवेदन लावून आम्ही त्यांचा आणि प्रशासनाचा निषेध केल्याचे जनरल सेक्रेटरी पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, प्रलंबित मागण्या सोडविण्याबाबत जिल्हा प्रशासनाने एक महिन्याच्या आत कार्यवाही न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल.अन्य मागण्या अशा६० वर्षे वयावरील सर्व शेतमजुरांना पेन्शन योजना चालू करावी.शेतमजुरांना आरोग्य सवलती द्याव्यात.शेतमजुरांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा मोफत, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे.