शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

अन्नदात्याच्या न्यायासाठी कोल्हापुरातील साहित्यिकांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 6:30 PM

FarmarStrike, literature, kolhapur अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या चारही सीमांवर गेल्या २३ दिवसांपासून न्यायासाठी टाहो फोडणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता कोल्हापुरातील चाळीसहून अधिक साहित्यीक गुरुवारी एकत्र आले आहेत.

ठळक मुद्देअन्नदात्याच्या न्यायासाठी कोल्हापुरातील साहित्यिकांचा पाठिंबा चार टप्प्यांत होणार आंदोलन

कोल्हापूर : अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या चारही सीमांवर गेल्या २३ दिवसांपासून न्यायासाठी टाहो फोडणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता लेखणीही पुढ सरसावली आहे.

कोल्हापुरातील चाळीसहून अधिक साहित्यीकांनी गुरुवारी एकत्र येऊन या आंदोलनात सक्रीय होऊन मातीचे ऋण फेडण्याचा निश्चय केला. नुसता पाठींबा देऊन न थांबता यात सक्रीयपणे उतरण्यासाठी चार टप्प्यात आंदोलनाची दिशाही ठरवण्यात आली.गुरुवारी कोल्हापुरात पत्रकार बैठक घेऊन लेखक चंद्रकुमार नलगे, आप्पासो खोत, प्रा. शरद गायकवाड,राजाभाऊ शिरगुप्पे, शिवाजीराव परुळेकर, किसन कुराडे, संजय सौंदलगे यांनी साहित्यीकांच्या वतीने भूमिका स्पष्ट केली.असे असणार आंदोलनाचे टप्पे

  • पहिला टप्पा: अन्यायकारक कायदे मागे घेऊन अन्नदात्याला न्याय देण्याची मागणी देणारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
  • दुसरा टप्पा: कोल्हापुरातील सर्व साहित्यीक राष्ट्रीपती व पंतप्रधान यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंती करणार
  • तिसरा टप्पा: शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांच्याकडून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पोस्टकार्ड लिहून पंतप्रधानांना पाठवणार
  • चौथा टप्पा: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार

हे साहित्यीक होणार सहभागीडॉ. सुनिलकुमार लवटे, चंद्रकुमार नलगे, आप्पासो खोत, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. राजन गवस, राजाभाऊ शिरगुप्पे, प्रा. शरद गायकवाड, डॉ. रविद्र ठाकूर, प्रा. किसनराव कुराडे, डॉ. रणधीर शिंदे, प्रा.गोमटेश पाटील, राजन कोनवडेकर, महावीर कांबळे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अरुण शिंदे, प्रा. ए.डी.कुंभार, रमेश जाधव, संजय खोचारे, रविंद्र गुरव, एकनाथ पाटील, गोविंद पाटील, शाम कुरळे, रा.तू.भगत, रजनी हिरळीकर, अशोक पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, चंद्रकांत निकाडे, जीवनराव साळोखे, डॉ. मारुती गुरव, विश्वास सुतार, परशराम आंबी, निलम माणगावे, राजंद्र पाटील, मनोहर मोहिते, संजय मगदूम, संजय सौंदलगे, डॉ. राजेंद्र कुंभार, दिनकर पाटील, सुभाष विभुते, बा.स.जठार, टी.आर.गुरव, जुई कुलकर्णी.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपliteratureसाहित्यkolhapurकोल्हापूर