शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

खासगी ‘शिवशाही’ बस कंपनीवर होणार दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 6:01 PM

गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचा आरोप करीत, एस.टी. महामंडळाच्या गारगोटी आगारातील ‘शिवशाही’च्या खासगी बसचालकांनी सोमवारी (दि. ९) ‘काम बंद’ आंदोलन केले. यामुळे ‘शिवशाही’च्या बसफेऱ्या अचानक रद्द झाल्याने प्रवाशांचे नाहक हाल झाले. या काम बंद आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, संबंधित खासगी शिवशाही कंपनीवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्देखासगी ‘शिवशाही’ बस कंपनीवर होणार दंडात्मक कारवाईगारगोटीतील चालकांचे ‘काम बंद’ आंदोलनप्रशासनाने वेळीच आळा घालणे गरजेचे

कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचा आरोप करीत, एस.टी. महामंडळाच्या गारगोटी आगारातील ‘शिवशाही’च्या खासगी बसचालकांनी सोमवारी (दि. ९) ‘काम बंद’ आंदोलन केले. यामुळे ‘शिवशाही’च्या बसफेऱ्या अचानक रद्द झाल्याने प्रवाशांचे नाहक हाल झाले. या काम बंद आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, संबंधित खासगी शिवशाही कंपनीवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भाडेतत्त्वावर ७०० शिवशाही एस.टी. बसेस आपल्या ताफ्यात घेतल्या आहेत. कोल्हापूर विभागात चार खासगी कंपन्यांकडून ३८ शिवशाही गाड्या विविध मार्गांवर धावत आहेत. गारगोटी येथील खासगी शिवशाही बसचालकांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळत नाही व गाड्या नादुरुस्त असल्याच्या कारणातून त्यांनी काम बंद आंदोलन केले.परिणामी पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या ‘शिवशाही’च्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. खासगी कंपनी व महामंडळातील झालेल्या करारानुसार अचानक गाडी फेऱ्या रद्द झाल्याने संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करणार आहे. मात्र प्रशासनाने वेळीच खासगी शिवशाही गाड्यांसंबंधित अशा घटनांना आळा घालणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

 

टॅग्स :Shivshahiशिवशाहीkolhapurकोल्हापूर