कोल्हापूर : शहरात विनामास्क फिरणाऱ्या १२९ नागरिकांकडून ६४ हजार ५००, फिजिकल डिस्टन्स न ठेवणाऱ्या १५ नागरिकांकडून १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सुरू ठेवणाऱ्या १३ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून १८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई गंगावेश, रंकाळावेश, लक्ष्मीपुरी, उतरेश्वर, लक्षतीर्थ वसाहत, महाद्वार रोड, शिवाजी पेठ, फुलेवाडी, नाना पाटीलनगर, जरगनगर, रायगड कॉलनी, साने गुरुजी वसाहत, साळोखेनगर, संभाजीनगर, खासबाग, जवाहरनगर, उद्दयमनगर, प्रतिभानगर, शाहुनगर, राजारामपुरी , शाहुपुरी , टेंबलाईवाडी, विक्रमनगर, राजेन्द्रनगर, सायबर चौक, मार्केट यार्ड, रुईकर कॉलनी, कदमवाडी, सदरबाजार, कसबा बावडा, लाईन बाजार, ताराबाई पार्क, नागाळा पार्क परिसरात करण्यात आली.