कळे परिसरामध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असून नागरिकांकडून लॉकडाऊन नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी प्रियदर्शनी मोरे यांनी कळे येथे भेट देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी करून प्रशासनास सूचना केल्या. कुंभारवाडा चौकांमध्ये अनावश्यक वर्दळ दिसून आल्याने येथे थांबून पथकाने रस्त्यावर विनाकारण फिरणारे नागरिक व वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करत १७ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कवठेकर , विस्तारअधिकारी पी. डी. भोसले, आर. एम. तळपे, मंडलधिकारी सुरेश ठाकरे, ग्रामविकास अधिकारी आर. आर. पाटील, तलाठी संदीप कांबळे, भिकाजी काळे यांच्यासह ग्रामपंचायत व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ०५ कळे कारवाई
ओळ कळे : कुंभारवाडा चौकामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करताना जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी मोरे, सुभाष सावंत व इतर.