इचलकरंजी : येथील सांगली रोडवरील भागातील नागरिकांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नगरपालिकेत बैठक पार पडली. या वेळी संबंधित विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिक हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
बैठकीत सांगली रोड येथील नवीन रस्ता उकरण्यास, तसेच नवीन पाईपलाईन करून पूर्व बाजूच्या सारण गटारीचे पाणी पश्मि बाजूच्या गटारीत सोडण्याचा निर्णय रद्द केला. जुन्या पाईप साफ करून घेणे व त्या पाईपच्या दोन्ही बाजूस चेंबर बसवून त्यावर जाळी टाकणे. बिग बझार ते काळ्या ओढ्यापर्यंत सारण गटार बनविण्यासाठी सर्व्हे करण्यास संबंधित बांधकाम विभागास आदेश देण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक राहुल खंजीरे, रवींद्र माने, महादेव गौड, बसय्या स्वामी, नगरअभियंता संजय बागडे, मुख्य शाखा अभियंता बबन खोत, सचिन वरपे, सूरज येलाज, विजय पाटील उपस्थित होते.