शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

दोन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्याची दरडोई उत्पन्नात पीछेहाट, राज्याच्या तुलनेत नऊ वर्षांत पहिल्यांदा मागे

By समीर देशपांडे | Published: June 28, 2024 1:20 PM

‘कृषी आणि कृषिपूरक उद्योग-व्यवसायाची जननी’ अशी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे

दोनच दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये ‘शाश्वत विकास परिषद’ पार पडली. महाराष्ट्र शासन आणि शासनानेच स्थापन केलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्युटशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन मित्र, मुंबई यांच्या वतीने ही परिषद झाली. यानिमित्ताने कोल्हापूरच्या विकासाचे वास्तव, सद्य:स्थिती आणि भविष्यातील संधी यांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली. यानिमित्ताने संकलित करण्यात आलेली आकडेवारी आणि तथ्यांच्या आधारे कोल्हापूरच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्यात आला. विकास प्रक्रियेची सद्य:स्थिती आणि भविष्य यांचा वेध घेणारी मालिका आजपासून..समीर देशपांडेकोल्हापूर: केंद्र शासनाच्या निती आयोगाने यापुढच्या काळात विकास योजना या वरून न थोपविता त्या जिल्हापातळीवरच बनवल्या जाव्यात आणि त्यांची अंमलबजावणी व्हावी, असे धोरण स्वीकारले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जाहीर करण्यात आलेला सन २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ करण्याचा संकल्प अमलात आणण्यासाठी प्रत्येक राज्याने एक संस्था स्थापन करण्याच्या सूचना केंद्राने केल्या होत्या. त्यानुसारच महाराष्ट्रात ‘मित्र’ संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या पुढाकारातून प्रत्येक जिल्ह्याचा क्षेत्रनिहाय अहवाल महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने शासनाला सादर केला आहे.या अहवालातील माहितीनुसार सन २०११-१२ ते सन २०१९-२० अखेर कोल्हापूर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न हे महाराष्ट्र राज्याच्या दरडोई उत्पन्नापेक्षा अधिक होते; परंतु कोविड १९ च्या लाटेनंतर परिस्थिती बदलली आहे. पुढच्या २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन्ही वर्षांचे दरडाेई उत्पन्न हे राज्यापेक्षा घटले असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातही २०१९-२० पेक्षा जिल्ह्याचे उत्पन्न वाढले; परंतु तरीही ते राज्यापेक्षा कमी भरले आहे.

कोल्हापूर जिल्हा दृष्टिक्षेपातघटक  -  महाराष्ट्र  - कोल्हापूर

  • भौगोलिक क्षेत्र (हेक्टर)  - ३०,७५८ - ७,७६० 
  • २०११ नुसार लोकसंख्या - ११,२३,७४,००० - ३८,७६,००० 
  • लोकसंख्या घनता प्रति कि.मी. - ३६५ - ५०४
  • दरडाेई उत्पन्न  -  २,४८,६३२ - १,०२,५१५ 
  • वनक्षेत्र  -  १६.९४ टक्के - १८.४२ टक्के

वर्षनिहाय राज्य, कोल्हापूरचे दरडोई उत्पन्न रुपयांतवर्ष -  राज्य  - कोल्हापूर जिल्हा

  • २०११/१२ - १,१३,१९२ - १,१६,९०७
  • २०१२/१३ -  १,२७,६०६ -१,३२,६२७
  • २०१३/१४ - १,४२,६३४ - १,४५०८४
  • २०१४/१५ -  १,५२,१५८ - १,५६,४३१
  • २०१५/१६ -  १,६६,३५१ - १,७१,७५८
  • २०१६/१७ -  १,८४,११३ - १,८७,९८४
  • २०१७/२०१८ -  १,९५,१९५ - २,०१,३२९
  • २०१८/२०१९ -  २,०७,८३३ - २,१२,५३३
  • २०१९/२०२० - २,१६,३६५ - २,१९,९९८
  • २०२०/२०२१-  २,११,९६५ - २,०५,६१३
  • २०२१/२०२२ - २,४८,६३२ - २,४१,६०७

कोल्हापूर जिल्ह्यात सेवाक्षेत्राची भरारी‘कृषी आणि कृषिपूरक उद्योग-व्यवसायाची जननी’ अशी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे; परंतु या क्षेत्राची कोल्हापूर जिल्ह्यातील जागा सेवा क्षेत्राने कधीच घेतली आहे. २०२०-२१ साली कोल्हापूर जिल्ह्यातील विकासदरामध्ये कृषी आणि कृषिपूरक व्यवसायांचा ११.३४ टक्के इतका वाटा होता. उद्योग क्षेत्राचा हाच वाटा २३.३३ टक्के होता; तर सेवाक्षेत्राचा तब्बल ५४.४४ टक्के इतका होता. मात्र या उलट कृषी आणि कृषिपूरक क्षेत्रांत कार्यरत नागरिकांची संख्या ही सर्वाधिक म्हणजे ५२.६४ टक्के इतकी आहे. उद्योगक्षेत्रात हीच कार्यरतांची संख्या २०.७ टक्के असून सेवाक्षेत्रामध्ये ही टक्केवारी २६.६६ इतकी आहे.

राज्यात कोल्हापूरचा सहावा क्रमांकजीडीपी आणि दरडोई उत्पन्न यांवर आधारित महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे तीन विभाग करण्यात आले आहेत. राज्याच्या एकूण जीडीपीमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि रायगड या पाच जिल्ह्यांचा तब्बल ५४ टक्क्यांचा वाटा आहे. याचा एक विभाग ‘मित्र’ने केला असून, दुसऱ्या विभागात कोल्हापूर पहिल्या आणि राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या विभागात कोल्हापूरसह ११ जिल्हे असून त्यांचा जीडीपीतील वाटा २६ टक्के आहेत; तर उर्वरित १८ जिल्ह्यांचा वाटा २० टक्के आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर