प्रवीण देसाई
कोल्हापूर : जिल्ह्यात नव्याने पाच नगरपालिकांची भर पडल्याने शहरी मतांचा टक्का वाढला आहे; तर पाच मोठ्या ग्रामपंचायती कमी झाल्याने ग्रामीण मतदानामध्ये थोडी घट झाली आहे. नगरपालिकांतील नगरसेवकांमुळे आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सुमारे ९० मतदान वाढणार आहे.
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण मतदानाचा आढावा घेतल्यावर तुलनात्मकरीत्या ग्रामीण भागातील मतदान हे अधिक असले तरी शहरी मतदानामध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. जिल्'ात एकूण ३० लाख ८६ हजार ८३४ इतके मतदान आहे. त्यातील २१ लाख २४ हजार ४७३ इतके मतदान ग्रामीण भागात, तर नऊ लाख ७१ हजार ५६१ इतके मतदान शहरी भागात आहे. शहरी मतदानामध्ये अलीकडे नव्यानेच झालेल्या हुपरी, शिरोळ, चंदगड, हातकणंगले, आजरा या नगरपालिकांच्या ७४ हजार ३८३ मतांचाही समावेश आहे. या मोठ्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपालिकेत झाल्याने मूळ जिल्हा परिषद गटांवरही त्याचा परिणाम होणार आहे. २०१२ मध्ये जिल्हा परिषदेचे ६९ मतदार संघ (गट) होते. ते २०१५ मध्ये कमी होऊन ६७ वर आले आहेत.
आता संबंधित जिल्हा परिषद गटातून ही मोठी गावे कमी झाल्याने शेजारील मोठ्या गावांचा नवीन मतदारसंघ होऊ शकतो किंवा ती उर्वरित गावे शेजारील दुसऱ्या जिल्हा परिषदेच्या गटाला जोडली जाऊ शकतात. त्यामुळे जिल्हा परिषद गटांची संख्या तीच राहणार की कमी होणार, हे पुढील वर्षी होणाºया प्रभागरचनेत स्पष्ट होईल.
- पाच ग्रामपंचायती झाल्या कमी
जिल्'ात एकूण १०२५ ग्रामपंचायती असून, यामधील हुपरी, शिरोळ, चंदगड, हातकणंगले, आजरा या मोठ्या ग्रामपंचायतींची नगरपालिका झाल्याने जिल्'ात आता ग्रामपंचायतींची संख्या कमी होऊन १०२० इतकी झाली आहे.
- विधान परिषदेसाठी ९० मतदान वाढले
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सध्या ३६१ इतकी मतदार संख्या आहे. यामध्ये महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांचा समावेश आहे. जिल्'ातील पाच नगरपालिका नव्याने झाल्याने प्रत्येक १८ याप्रमाणे पाच नगरपालिकांचे ९० नगरसेवकांचे मतदान वाढणार आहे. त्यामुळे आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण ४४६ मतदार संख्या होईल.
- ‘ग्रामीण’मधून ७४ हजार मतदान झाले कमी
जिल्'ातील एकूण २१ लाख २४ हजार ४७३ ग्रामीण मतदानापैकी ७४ हजार ३८३ इतके मतदान हे हुपरी, शिरोळ, चंदगड, हातकणंगले, आजरा या मोठ्या ग्रामपंचायतींचे नगरपालिकेत रूपांतर झाल्याने कमी झाले आहे.
- जिल्हा परिषद गटातील गावांची संख्या
आजरा जिल्हा परिषद मतदारसंघात २२ गावे आहेत. शिरोळमध्ये पाच, चंदगडमध्ये २७, हुपरीमध्ये चार, हातकणंगलेमध्ये नऊ गावांचा समावेश आहे.जिल्'ातील शहरी मतदानमहापालिका / नगरपालिका मतदानकोल्हापूर महापालिका ४४७४७२चंदगड ७७५७आजरा १३००५गडहिंग्लज २८३५५कागल २५१०२मुरगूड ९६८२पन्हाळा २७१४मलकापूर ४६३७वडगाव २१२९२इचलकरंजी २९२५४१हुपरी २२०३०जयसिंगपूर ४७१३०कुुरुंदवाड १८२५३शिरोळ २२३९१===========एकूण ९७१५६१===========