खोची : नरहरी विकास सेवा संस्थेने शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच विधायक उपक्रम राबविले आहेत. सभासदांना ९ टक्के लाभांश देऊन सहकारात आदर्शवत कामगिरी केली आहे. संस्थेच्या प्रगतीची घोडदौड गतीने सुरू आहे, असे प्रतिपादन वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील यांनी केले.
लाटवडे येथील संस्था कार्यालयात संस्थेच्या ८० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाअध्यक्ष माणिक पाटील होते. ही सभा ऑनलाईन झाली.
माणिक पाटील म्हणाले, संस्थेला ११ लाख रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेची कर्ज वसुली शंभर टक्के झाली असून, १३ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल झाली आहे. सभासदांच्या हितासाठी संस्था कटिबद्ध आहे.
यावेळी ॲड. शहाजी पाटील, संभाजी पाटील, उत्तम पाटील, पांडुरंग पाटील, किरण पाटील, अशोक पाटील, महादेव पाटील, संचालक एम. आर. पाटील, जे. पी. पाटील, बाळासाहेब पाटील, कुमार पाटील, जगदीश पाटील, नंदिनी पाटील, संजय यादव, जयसिंग वाघमारे, संजय नाईक उपस्थित होते.
अहवाल वाचन सचिव पतंगराव पाटील यांनी केले. आभार एम. आर. पाटील यांनी मानले.
फोटो ओळी-लाटवडे येथील नरहरी विकास सेवा संस्थेच्या ऑनलाईन सभेत वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माणिक पाटील, संभाजी पाटील, पांडुरंग पाटील, उत्तम श्री. पाटील, पतंगराव पाटील, जे. पी. पाटील, एम. आर. पाटील उपस्थित होते.