राजाराम कांबळे । लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शाहूवाडी तालुक्यात पहिला महात्मा गांधी तंटामुक्त योजनेचा पुरस्कार मिळविणाऱ्या पेरीड गावात गेली साठ वर्षे झाली येथील ग्रामपंचायत व विविध संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आजदेखील बिनविरोधची परंपरा गावच्या एकोप्यामुळे कायम राहिली आहे. पस्तीस लाखांची ठेव बँकेत ठेवणारी पेरीड ग्रामपंचायत जिल्ह्यात पहिली असावी. कडवी नदीच्या तीरावर वसलेले पेरीड गाव. अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावचा मुख्य व्यवसाय शेती आहे. २३ मार्च १९५६ ला पेरीड ग्रामपंचायतीची स्थापना झाली. पेरीड गावात सर्व कार्यकर्ते, नेते मंडळी असूनदेखील गावात निवडणूक झालेली नाही, हेच विशेष. ग्रामपंचायत अथवा कोणत्याही संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जवळ आली की गावातील ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन त्यामधील तीन ज्येष्ठांची समिती गठीत केली जाते. ग्रामपंचायतीसमोर संपूर्ण गावातील नागरिकांना एकत्र बोलावून घेतले जाते. यासाठी गावात दवंडी दिली जाते. गावातील नागरिक एकत्रित आल्यानंतर निवडणुकीस इच्छुक असणाऱ्यांची यादी तयार केली जाते. इच्छुकांना ज्येष्ठ मंडळी प्रश्न विचारतात. या सर्वांमधून तीनजणांची समिती बंद खोलीत निर्णय घेऊन सदस्यांची बाहेर येऊन नावे पुकारली जातात. सार्वजनिक कामात त्या व्यक्तीचा किती सहभाग आहे, यावरून त्याची निवड केली जाते. निवड झालेल्या सदस्यांची यादी निवडणूक विभागाकडे पाठविली जाते. अशा पद्धतीने पेरीड गावात ग्रामपंचायत व विकास सेवा सोसायटी व सहा दूध संस्था कार्यरत आहेत. तर पहिली ते सातवीपर्यंत मराठी शाळा, तर गावात प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय आहे. कै. लक्ष्मण सुभाना पाटील यांना पेरीड गावचा सरपंचपदाचा पहिला मान मिळाला. आजपर्यंत माजी आमदार राऊ धोंडी पाटील, विठ्ठल रावजी पाटील, माजी पंचायत समिती सदस्य बापू साधू पाटील, कै. गणपती जोती पाटील, वसंत लक्ष्मण पाटील, पांडुरंग गणपती कुंभार, तंटामुक्त अध्यक्ष आबाजी ईश्वरा पाटील, संजय श्रीपती पाटील, सौ. अनिता राजाराम पाटील, जि. प. सदस्य बांधकाम सभापती सर्जेराव बंडू पाटील यांना सरपंचपद भूषविण्याचा मान मिळाला आहे. गावच्या एकीमुळे पेरीड गावाला तंटामुक्त पुरस्कार, निर्मलग्राम पुरस्कार, यशवंत ग्रामसमृद्धी आदी पुरस्कारांनी गावची शोभा वाढविली आहे. २०१५ ला खासदार राजू शेट्टी यांनी पेरीड गावची संसद आदर्श म्हणूून निवड केली. शाहूवाडी तालुक्याचे पहिले सभापती होण्याचा मान माजी आमदार राऊ पाटील यांना मिळाला. पुढे १९६७ साली राऊ पाटील विधानसभेवर निवडून आले. पंचायत समिती सदस्य म्हणून बापू साधू पाटील, राऊ पाटील, सौ. वंदना संजय पाटील यांना मान मिळाला. जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलग पंधरा वर्षे, तर जि. प.चे बांधकाम सभापती म्हणून सर्जेराव बंडू पाटील-पेरीडकर यांची सध्या कारकीर्द सुरू आहे. गावातीलच पै. बाजीराव पाटील, पै. धर्मासिंग कांबळे, पै. रंगा पाटील यांनी महाराष्ट्र चॅम्पीयन होण्याचा मान मिळविला. ग्रामपंचायतीने दोन कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना बांधली आहे. विद्यार्थ्यांसाठी गावात ग्रामपंचायतीने वाचनालय सुरू केले आहे. गावात १ कोटींचे ग्रा.पं., लोकसहभागातून सर्व संस्थांचे एकत्रित कार्यालय विधानभवन धर्तीवर बांधले जाणार आहे. +दुधाची पंढरीगावात सहा दूध संस्था असून, या सर्व संस्थांच्या स्वमालकीच्या इमारती आहेत. दरवर्षी लाखो लिटर दूध संकलन करून विविध संघांना पाठविले जाते. या दूध संस्थांमुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा खेळता राहात आहे. तीस लाख रुपयांची ठेव ठेवणारी संस्थागावाची शान वाढविणारी रत्ने पेरीड विकास सेवा सोसायटीच्या संचालकांनी काटकसरीने कारभार करून तीस लाखांची ठेव बँकेत ठेवली आहे. दरवर्षी सभासदांना लाभांश वाटणारी संस्था म्हणून शाहूवाडी तालुक्यात नावाजली आहे. बाजीराव पाटील, पोलीस निरीक्षक, राष्ट्रपतीपदक विजेते.धर्मासिंग कांबळे (पोलीस उपनिरीक्षक) ४कुसुम कांबळे (पोलीस निरीक्षक)नथुराम वाघ (प्रबंधक, बँक आॅफ इंडिया) ४युवराज दळवी (पोलीस उपनिरीक्षक)राऊ धोंडी पाटील (माजी आमदार)सर्जेराव बंडू पाटील (जिल्हा बंँक संचालक, बांधकाम सभापती)सौ. वंदना संजय पाटील (माजी. पं. स. सदस्य)बापू साधू पाटील (माजी पं. स. सदस्य)दिलीप आनंदा पाटील (उपनगराध्यक्ष, मलकापूर नगरपालिका)आनंदा केसरे (माजी नगरसेवक, मुंबई)विशाळगड जहागिरीत फौजदारपदाचा मान पेरीड गावच्या सुपुत्रालाविशाळगड जहागिरीच्या काळात पेरीड गावचे सुपुत्र तुकाराम नलवडे हे फौजदार म्हणून कार्यरत होते. विशाळगड जहागिरी व पेरीड गावच्या घनिष्ठ संबंधामुळे नवरात्रोत्सव काळात सलग पाच वर्षे पंतप्रतिनिधींच्या हस्ते सोन्याचा नारळ दिला जात होता.
पेरीडला ६० वर्षांची ‘बिनविरोध’ परंपरा !
By admin | Published: May 29, 2017 12:30 AM