शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

रेड झोनमधील बांधकामांना आयुक्तांकडूनच परवानगी

By admin | Published: July 26, 2016 12:29 AM

नगररचना सहायक संचालक : शिवसेना शिष्टमंडळाला दिले उत्तर

कोल्हापूर : शहरातील रेड झोनमधील बांधकामांबाबत सोमवारी शिवसेनेने महापालिकेचे नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांना धारेवर धरले. रेड झोनमधील बांधकामाबाबत राज्य शासनाकडून कोणतीही नियमावली आली नसल्याने आयुक्तांच्या अधिकारात अशा बांधकामांना परवाना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.रेड झोनमधील बांधकामांबाबत राज्य शासनाकडून कोणत्याही सूचना अगर नियमावली आली नसताना कोणत्या अधिकारात बांधकाम व्यावसायिकांना परवानगी दिली? असा जाब विचारत अशा बेजबाबदारपणे परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी केली तसेच अशा रेड झोनमधील बांधकामांना भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे धोका पोहोचणार नाही, असे लेखी प्रतिज्ञापत्र देण्याची मागणी केली. संबंधित प्रतिज्ञापत्र येत्या चार दिवसांत देण्याचे आश्वासन खोत यांनी शिष्टमंडळास दिले .शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार व शहरप्रमुख शिवाजीराव जाधव व दुर्गेश लिंग्रस यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने सहायक संचालक खोत यांची राजारामपुरी येथील कार्यालयात भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली.कोल्हापूर शहरात पूर नियंत्रण रेषेमध्ये (रेड झोन) भविष्यात पुराच्या पाण्यापासून धोका निर्माण होऊ शकतो. अशा ठिकाणी बांधकाम विकासासाठी परवानगी देऊ नये, अशी अनेक वर्षांपासून कोल्हापुरात मागणी होत आहे; पण कायद्यातील पळवाटा, प्रशासनातील काही अधिकारी व बिल्डर लॉबीची मिलिभगत यामुळे रेड झोन परिसरात सिमेंटचे जंगल उभारले. जनतेच्या जीविताला धोका पोहोचत आहे म्हणून भविष्यात कोणतीही हानी होऊ नये म्हणून खबरदारी प्रशासनाने घेणे आवश्यक आहे, असे संजय पवार यांनी नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांना सुनावले.यावेळी रेड झोनबाबत शासनाकडून कोणतीही नियमावली आली नसून आयुक्तांच्या अधिकारात हे बांधकाम परवाना देण्यात आल्याचा खुलासा धनंजय खोत यांनी केला.या शिष्टमंडळात रवी चौगुले, अवधूत साळोखे, राजू यादव, रणजित आयरेकर, दिलीप देसाई, तानाजी इंगळे, शशिकांत बिडकर, मंजित माने, शरद चौगुले, नितीन पाथरवट, अजिंक्य बिरंजे, धनाजी यादव, शुभांगी साळोखे, सुजाता सोहनी, दीपाली शिंदे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)