शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

corona virus : शाळा उघडण्यास परवानगी; पालकांची वाढली धाकधूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 12:23 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप पूर्णपणे कमी झालेला नसल्याने आणि त्यातच नव्या ‘ओमीक्रॉन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक नियमावली लागू केल्याने आई-बाबाची धाकधूक वाढली आहे.

संतोष मिठारीकोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळेत जायला मिळाले नसल्याने इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची मुले कंटाळली आहेत; मात्र आता राज्य शासनाने बुधवार (दि. १ डिसेंबर) पासून पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन भरविण्यास परवानगी दिली आहे; पण कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप पूर्णपणे कमी झालेला नसल्याने आणि त्यातच नव्या ‘ओमीक्रॉन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक नियमावली लागू केल्याने आई-बाबाची धाकधूक वाढली आहे.ऑनलाइन आणि समूह अध्यापनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. विद्यार्थी संख्या कमी असलेल्या गावांमध्ये पाचवीपासूनचे वर्ग गेल्या चार महिन्यांपूर्वी सुरू झाले आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहर आणि जिल्ह्यात इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग भरविण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार शाळांकडून तयारी सुरू झाली आहे.

आता मज्जाच मजा

कोरोनामुळे मला शाळेत जाता आले नाही. आता शाळेत जायला मिळणार असल्याने चांगले वाटत आहे. -प्रगती हेंबाडे, इयत्ता पहिली.

माझी शाळा सुरू झाली आहे. आता इतर मुलांची शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे मजा येणार आहे. -सिद्धार्थ कदम, इयत्ता दुसरी.

शाळेत जायला मिळणार असल्याने मला आनंद वाटत आहे. बाबांनी मला कपडे, दप्तर नवीन आणले आहे. -स्वरूप तोरस्कर, इयत्ता पहिली

आई-बाबाची काळजी वाढली

शाळा सुरू होणे चांगले आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन मुलांकडून होईल यादृष्टीने शाळा आणि पालकांना काळजी घेणे आवश्यक आहे. -दीपक पाटील

वर्ग प्रत्यक्षात सुरू होणार असल्याने मुलांच्या शिक्षणाला गती मिळणार आहे; पण कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला नसल्याने थोडी भीतीही वाटत आहे. -अपर्णा सुतार

मुलांच्या शिक्षणाच्यादृष्टीने पाहता शाळा सुरू करणे योग्य आहे; मात्र नवा विषाणूमुळे पुन्हा आमची धाकधूक वाढली आहे. -दीपाली पोतदार 

जिल्ह्यात ऑनलाइन आणि समूह अध्यापनाच्या माध्यमातून शाळा सुरू आहेत. शासनाने १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत दिलेल्या निर्देशानुसार शाळांना सूचना केल्या आहेत. जास्त पट असलेल्या ठिकाणी एक दिवस आड आणि कोरोना नियमांचे पालन करत वर्ग भरविण्याबाबत सूचना शाळांना दिल्या आहेत. -जयश्री जाधव, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग.

जिल्ह्यातील शाळा आणि विद्यार्थी

जिल्ह्यातील एकूण शाळा : ३७१५शासकीय शाळा : २१२०

खासगी शाळा : १५९५पहिली : ५५३०१

दुसरी : ५७४५२तिसरी : ५७६०९

चौथी : ५७८३४पाचवी :५७८४१

सहावी : ५७३९५सातवी : ५८३२०

आठवी : ५८८००नववी : ६०२२६

दहावी : ५९४०१

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा